E-Rupee Launched : पहिल्याच दिवशी 1.71 कोटी व्यवहार; 'या' चार बँकांमध्ये मिळणार ई-रुपीची सुविधा

सरकारला भविष्यात नोटा छापण्याची गरज भासणार नाही, असं अर्थतज्ज्ञांच मत आहे.
E-Rupee Launched
E-Rupee Launchedsakal
Updated on

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने कालपासून डिजिटल रुपी (ई-रुपी) लाँच केले आहे. मध्यवर्ती बँकेने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या टप्प्यात मुंबई, दिल्ली, बेंगळुरू आणि भुवनेश्वरमधील लोक ई-रुपीचा वापर करू शकतील. आरबीआयने नुकतेच एका पायलट प्रोजेक्टवर ई-रुपी सुरू केले आहे. यासाठी एसबीआय, आयसीआयसीआय, येस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक यांची निवड करण्यात आली आहे. लवकरच देशातील इतर राज्यांमध्ये सर्वसामान्यांसाठी ई-रुपी सुरू होईल अशी शक्यता आहे. 

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

पहिल्याच दिवशी बँकांकडून 1.71 कोटी डिजिटल रुपयांची मागणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना एसबीआय, आयसीआयसीआय, येस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक या चार बँकांमध्ये डिजिटल रुपी उपलब्ध आहे. बँकांच्या मागणीनुसार मध्यवर्ती बँकेने डिजिटल रुपया जारी केला होता.

ई-रुपी P2P (पर्सन टू पर्सन) आणि P2M (पर्सन टू मर्चंट) या दोन्ही मोडमध्ये वापरला जाऊ शकतो. याच्या वापरामुळे UPI आणि इतर ऑनलाइन माध्यमातून केलेल्या पेमेंटमध्ये लागणाऱ्या अनावश्यक शुल्कापासूनही सुटका होईल.

E-Rupee Launched
LIC Service : LIC ची मोठी घोषणा; ग्राहकांसाठी करणार 'हा' बदल

डिजिटल रुपयाबद्दल अर्थतज्ज्ञांचे मत काय आहे?

डिजिटल रुपी बद्दल महेश शुक्ला, सीईओ आणि पे-मीचे संस्थापक सांगतात की, लोक रोज वापरत असलेल्या चलनी नोटा आणि नाणी या पारंपारिक चलनाची डिजिटल रुपया ही डिजिटल आवृत्ती आहे. तुम्ही पैसे डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवू शकता. डिजिटल रुपया हा ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित आहे. यामुळे सरकारला भविष्यात कमी नोटा छापण्याची गरज भासणार आहे.

रुपी ही पूर्णपणे सरकार नियंत्रित कायदेशीर चलन आहे. यामध्ये आरबीआय नियामक म्हणून असेल आणि इतर बँका व्यवहारात मदत करण्यासाठी आरबीआय सोबत असतील. व्यवहारांमध्ये कोणतीही अडचण आल्यास वित्तीय संस्था हस्तक्षेप करू शकतात. रोख चलनाप्रमाणेच डिजिटल रुपीचा वापर केलाजाईल. याशिवाय यामध्ये डिजिटल चलनाचे रोख स्वरुपात  रूपांतर करता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.