Budget 2023: अर्थसंकल्पापूर्वी मोदी सरकारला मोठा झटका! गेल्या तीन वर्षात सर्वात कमी...

आर्थिक सर्वेक्षण येण्यापूर्वीच सरकारला मोठा झटका?
Union Budget Updates
 Budget Expectations and Key announcements
 Budget Expert Opinions
Union Budget Updates Budget Expectations and Key announcements Budget Expert Opinionsesakal
Updated on

Budget Expectations and Key announcements: संसदेचे अर्थसंकल्प 2023 अधिवेशन आज सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे, परंतु आर्थिक सर्वेक्षण येण्यापूर्वीच सरकारला मोठा झटका बसू शकतो. रॉयटर्सच्या अहवालानुसार, 2023-24 मध्ये विकास दर 3 वर्षांतील सर्वात कमी असणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थसंकल्पापूर्वी सरकार आज जो आर्थिक सर्वेक्षण सादर करणार आहे, त्यात विकास दर 6 ते 6.8 टक्के राहण्याची अपेक्षा आहे.

Union Budget Updates
 Budget Expectations and Key announcements
 Budget Expert Opinions
Gautam Adani: अदानी ग्रुपला मोठा झटका! टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर

आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत आर्थिक सर्वेक्षण 23 मांडतील. अर्थमंत्री आर्थिक पाहणी सादरीकरणाच्या एका दिवसानंतर बुधवारी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील.

संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर केल्यानंतर, मुख्य आर्थिक सल्लागार (CEA) V. अनंत नागेश्वरन पत्रकार परिषद घेऊन या सर्वेक्षणाविषयी मीडियाला माहिती देतील. संसदेच्या दोन्ही सभागृहात आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते.

Union Budget Updates
 Budget Expectations and Key announcements
 Budget Expert Opinions
राष्ट्रीय महिला आयोग काय करतं? कशी करावी तक्रार, जाणून घ्या

मुख्य म्हणजे आर्थिक सर्वेक्षण हा देशाच्या एका वर्षातील आर्थिक विकासाचा लेखाजोखा असतो. याद्वारे गेल्या वर्षभरात देशाची अर्थव्यवस्था कशी होती आणि कुठे, कुठे फायदा झाला आणि कुठे तोटा झाला, याचा अंदाज येतो.

Union Budget Updates
 Budget Expectations and Key announcements
 Budget Expert Opinions
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; ४ जण जागीच ठार

हे सर्वेक्षण कोण तयार करते?

अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी सादर होणारे हे आर्थिक सर्वेक्षण आर्थिक विभागाने तयार केले आहे. हा वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत असलेला विभाग आहे ज्याला आर्थिक व्यवहार म्हणूनही ओळखले जाते. हे आर्थिक विभागाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणजेच CEA च्या देखरेखीखाली तयार केले जाते. सर्वेक्षणाद्वारे सरकार देशाची सध्याची आर्थिक स्थिती कशी आहे हे सांगते आणि पुढील वर्षांचे अंदाजही व्यक्त करते. 1964 पासून अर्थसंकल्पासोबत आर्थिक सर्वेक्षण सादर केले जात होते, परंतु त्यानंतर ते अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी मांडले जाऊ लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.