EPFO केले 22.55 कोटी खात्यांमध्ये 8.50 टक्के दराने व्याज जमा!

EPFO केले 22.55 कोटी खात्यांमध्ये 8.50 टक्के दराने व्याज जमा! 'अशी' तपासा शिल्लक
EPFO
EPFOesakal
Updated on
Summary

ईपीएफओने आज (सोमवार) आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर याची घोषणा केली.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनने (Employees Provident Fund Organization - EPFO) 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 22.55 कोटी खात्यांमध्ये 8.50 टक्के दराने व्याज (Interest) जमा केले आहे. ईपीएफओने आज (सोमवार) आपल्या अधिकृत ट्विटर (Twitter) हॅंडलवर याची घोषणा केली. '2020-21 या आर्थिक वर्षासाठी 22.55 कोटी खात्यांवर 8.50 टक्के दराने व्याज जमा करण्यात आले आहे" असे ईपीएफओने ट्विटमध्ये म्हटले आहे.

EPFO
घर खरेदी करताय? तर जाणून घ्या SBI सह टॉप 10 बॅंकांमधील व्याजदर

'या' चार मार्गांनी ऑनलाइन तपासा आपली पीएफ शिल्लक

  1. शिल्लक तपासण्यासाठी, EPFO सदस्यांना EPFOHO UAN ENG टाइप करून 7738299899 वर एसएमएस करावा लागेल.

  2. किंवा तुम्ही 011-22901406 वर मिस्ड कॉल पाठवू शकता, त्यानंतर तुम्हाला पीएफ खात्यातील शिल्लक तपशीलांसह एक एसएमएस प्राप्त होईल.

  3. तुम्ही EPFO वेबसाइटद्वारे PF शिल्लक देखील तपासू शकता.

  4. तुम्ही तुमचा UAN आणि OTP सह लॉग इन केल्यानंतर UMANG ऍपवर तुमचे PF पासबुक देखील ऍक्‍सेस करू शकता.

EPFO ने 30 ऑक्‍टोबर 2021 रोजीच्या परिपत्रकात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सदस्य खात्यांकरिता 2020-21 या वर्षासाठी व्याजदर जाहीर केला होता. EPFO ने सांगितले की, श्रम आणि रोजगार मंत्रालयाने भविष्य निर्वाह निधी योजना, 1952 च्या पॅरा 60(1) अंतर्गत केंद्र सरकारच्या मान्यतेने प्रत्येक सदस्याच्या खात्यात 2020-21 या वर्षासाठी 8.50 टक्के दराने व्याज जमा करण्यास मान्यता दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()