EPFO: पीएफ कर्मचारी झाले मालामाल! या दिवशी खात्यात येईल मोठी रक्कम

केंद्र सरकारने पुन्हा एकदा पीएफ कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे.
EPFO
EPFOgoogle
Updated on

केंद्र सरकारने पुन्हा एकदा पीएफ कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. लवकरच पीएफ व्याजाचे पैसे खात्यात ट्रान्सफर करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जूनपर्यंत 8.1 टक्के व्याज खात्यात येईल. याचा फायदा ६ कोटींहून अधिक लोकांना होणार आहे.

EPFO ने अद्याप पैसे पाठवण्याची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही, परंतु काही मीडिया रिपोर्ट्सने असा दावा केला आहे. सरकारने बैठक घेऊन यावेळी सर्वात कमी व्याज देण्याचा निर्णय घेतला असून 40 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढं कमी व्याज असणार आहे. त्यामुळे पीएफ कर्मचार्‍यांना फायदा होणार आहे.

EPFO
EPFO : पीपीओ नंबर हरवलाय? असा करा पुन्हा सुरु

अशाप्रकारे तपासा तुमच्या खात्यातील पैसे-

तुम्ही तुमच्या पीएफ खात्यात किती रक्कम आहे, हे अगदी सहजतेने तपासू शकता. तुम्हाला तुमच्या पीएफ खात्याची शिल्लक तपासायची असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

तुम्ही PF खात्याशी लिंक असलेल्या रजिस्टर नंबरवरून 011-22901406 वर मिस-कॉल करून हे करू शकता. यानंतर लगेच तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर एक संदेश येईल, ज्यामध्ये पीएफ शिल्लक माहिती दिली जाईल.

EPFO
EPFO! आत्मनिर्भर भारत योजनेत नोंदणी करा, जबरदस्त फायदे मिळावा

तुम्ही तुमच्या पीएफ खात्याची रक्कम एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता

याशिवाय तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातील पैसे एसएमएसद्वारेही पाहू शकता. यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक ईपीएफओकडे नोंदणीकृत असावा. EPFO कडे नोंदणीकृत तुमच्या मोबाईल क्रमांकावरून तुम्हाला EPFO ​​UAN LAN 7738299899 वर पाठवावा लागेल.

LAN म्हणजे तुमची भाषा. तुम्हाला माहिती इंग्रजीमध्ये हवी असल्यास LAN मध्ये ENG लिहावे लागेल. त्याचप्रमाणे हिंदीसाठी HIN आणि मराठी MAR लिहावे. तुम्हाला हिंदीत माहिती मिळवण्यासाठी EPFOHO UAN HIN लिहून संदेश पाठवावा लागेल. यानंतर लगेचच तुम्हाला शिल्लक माहिती सहज मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()