MCAP : 10 पैकी 8 कंपन्यांचे बाजार भांडवल वाढले; ‘या’ कंपनीला सर्वाधिक नफा

इक्विटी मार्केटमधील ट्रेंडमध्ये टॉप-10 कंपन्यांपैकी आठ कंपन्यांचे बाजार भांडवल वाढून 2.03 लाख कोटी झाले.
Share Market
Share Marketesakal
Updated on

गेल्या आठवड्यात, इक्विटी मार्केटमधील ट्रेंडमध्ये टॉप-10 कंपन्यांपैकी आठ कंपन्यांचे बाजार भांडवल वाढून 2.03 लाख कोटी झाले. या कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने सर्वाधिक नफा कमावला आहे. गेल्या आठवड्यात बीएसई (BSE) सेन्सेक्स 1,387.18 अंकांनी (2.39%) वाढला होता.

रिलायन्सचे बाजार भांडवल 68.29 हजार कोटींनी वाढले

या काळात एचडीएफसी (HDFC) आणि बजाज फायनान्स (Bajaj Finserv) वगळता टॉप 10 पैकी 8 कंपन्यांचे बाजार भांडवल वाढले आहे. इंडेक्स हेवीवेट रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल रु. 68.29 हजार कोटींनी वाढून रु. 16.72 लाख कोटी झाले. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) बाजार भांडवलात 30.120 हजार कोटी रुपयांची वाढ झाली. त्यामुळे त्याचे एकूण बाजार भांडवल 5 लाख कोटी रुपये झाले.

बजाज फायनान्स(Bajaj Finserv) आणि एचडीएफसी (HDFC) बँकेचे बाजार भांडवल घसरले आहे. बजाज फायनान्सचे बाजार भांडवल 4.87 हजार कोटींनी कमी होऊन 4.35 लाख कोटींवर आले आहे आणि एचडीएफसी बँकेचे 1.50 हजार कोटी रुपये 8.01 लाख कोटींवर आले आहे.

Share Market
Red Bull owner Death : 'रेड बुल'चे मालक डायट्रिच मॅटेस्किट्झ यांचं 78 व्या वर्षी निधन

या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या क्रमांकावर आहे

सर्वात जास्त बाजार भांडवल कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज अव्वल स्थानावर आहे. यानंतर TCS, एचडीएफसी बँक (HDFC), आय.सी.आय बँक (ICICI), इन्फोसिस (Infosys), HUL, एसबीआय (SBI), भारती एअरटेल (Bharti Airtel), बजाज फायनान्स (Bajaj Finance) आणि ITC यांचा टॉप-10 कंपन्यांच्या यादीत समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.