Income Tax रिफंड क्लेम केल्यानंतरही खात्यात येणार नाहीत पैसे ? पाहा नियम...

तुमचा परतावा आयकर विभागाने तयार केला असेल, तर तो साधारणपणे एक ते चार आठवड्यांत तुमच्या खात्यात जमा होतो.
Income Tax Return
Income Tax Returngoogle
Updated on

मुंबई : प्राप्तिकर विभागाच्या वतीने आर्थिक वर्ष 2021-22साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. तुम्ही तुमचा ITR दाखल केला नसेल तर हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. अन्यथा, यानंतर तुम्हाला दंडाला सामोरे जावे लागू शकते. (Income Tax Return)

Income Tax Return
२० रुपयांची नोट बनवेल तुम्हाला लखपती

परतावा एक ते चार आठवड्यात येतो

इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरल्यानंतर, तुम्हाला आयकर विभागाकडून नोंदणीकृत ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबरवर संदेश मिळतो की तुमचा इन्कम टॅक्स रिफंड झाला आहे की नाही. जर तुमचा परतावा आयकर विभागाने तयार केला असेल, तर तो साधारणपणे एक ते चार आठवड्यांत तुमच्या खात्यात जमा होतो.

Income Tax Return
५० रुपयांची नोट बनवेल तुम्हाला लखपती; कसे ते पाहा...

खात्यात रक्कम येणार नाही

पण आयकराचा एक नियमही आहे ज्या अंतर्गत रिफंड करूनही विभागाकडून तुम्हाला पैसे परत केले जात नाहीत. म्हणजेच तुमच्या बँक खात्यात कोणतीही रक्कम येणार नाही.

आयटीआर फाइलिंग वेबसाइट Tax2win चे सीईओ अभिषेक सोनी म्हणतात की, 5 जानेवारी 2012 रोजी सरकारने जारी केलेल्या प्रेस नोटनुसार, जर तुमचा आयकर परतावा आयकर विभागाच्या गणनेनुसार 100 रुपयांपेक्षा कमी असेल तर तो तुमच्या बँक खात्यावर पाठवला जात नाही.

100 रुपयांपेक्षा कमी रकमेच्या परताव्यावर नियम लागू होतो

त्यांनी सांगितले की जर 100 रुपयांचा आयकर परतावा असेल तर तो तुमच्या पुढील वर्षाच्या आयकर परताव्यामध्ये समायोजित केला जाईल. उदाहरणार्थ, जर तुमचा आयकर परतावा 2020-21 या आर्थिक वर्षात 80 रुपये झाला असेल, तर तो तुमच्या खात्यात जमा होणार नाही.

पुढील वर्ष 2021-22 मध्ये, तुमचा आयकर परतावा 70 रुपये असल्यास, दोन्ही वर्षांसाठी (80 + 70) रुपये 150 जोडल्यास तुमच्या खात्यात जमा केले जातील. हा आकडा 100 रुपयांपेक्षा कमी असेल तर हे पैसे विभागाकडून दिले जात नाहीत.

एवढेच नाही तर तुमची कर देयता असली तरीही 100 रुपयांपेक्षा कमी रक्कम तुमच्या आयकरात समायोजित केली जाते. 2021-22 या आर्थिक वर्षासाठी, आयकर विभागाच्या वतीने आयकर रिटर्न भरणे 15 जून 2022 पासून सुरू झाले आहे. ITR दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे. यानंतर, आयटीआर भरल्यावर तुम्हाला दंड भरावा लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()