एवढ्या महागाईत एलपीजी सिलिंडर फुकट मिळत असेल, तर आणखी दुसरं काय हवं!
नवी दिल्ली : एवढ्या महागाईत एलपीजी सिलिंडर (LPG Gas Cylinder) फुकट मिळत असेल, तर आणखी दुसरं काय हवं! देशातील एका राज्यानं या महिन्याच्या अखेरीस लोकांना तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याची घोषणा केलीय. हे राज्य गोवा (Goa) असून येथील सरकारनं निवडणुकीपूर्वी मोफत गॅस सिलिंडर देण्याचं आश्वासन जनतेला दिलं होतं.
गोव्यात सध्या भारतीय जनता पक्षाचं सरकार (BJP Government) आहे. निवडणुकीपूर्वी भाजपनं आपल्या जाहीरनाम्यात दारिद्र्यरेषेखालील लोकांना (BPL) 3 गॅस सिलिंडर मोफत देणार असल्याचं सांगितलं होतं. सरकार स्थापन होऊन बराच काळ लोटला असल्यानं आता सरकारनं त्याची अंमलबजावणी करण्याची घोषणा केलीय. लाइव्ह मिंटनं राज्याचे ग्रामीण विकास मंत्री गोविंद गावडे (Govind Gawde) यांच्या हवाल्यानं ही माहिती प्रसिद्ध केलीय.
गोवा सरकारच्या (Government of Goa) म्हणण्यानुसार, ज्या कुटुंबांचं एकूण वार्षिक उत्पन्न 4 लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना या योजनेत समाविष्ट केलं जाईल. या उपक्रमांतर्गत 37,000 दारिद्रय रेषेखालील कुटुंबांचा यात समावेश असणार आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस त्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करणार असल्याचे गावडे यांनी सांगितले. साधारणपणे, प्रत्येक कुटुंबाला वर्षाला सहा सिलिंडर लागतात. आम्ही त्यांचे तीन सिलिंडरचे पैसे परत करू, असं आश्वासनही त्यांनी दिलंय.
याशिवाय केंद्र सरकारनं सांगितलं की, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (Pradhan Mantri Ujjwala Yojana) लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलिंडरवर 200 रुपयांची सबसिडी दिली जाईल. केंद्राचं एलपीजी अनुदान आता उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजी कनेक्शन घेतलेल्या ९ कोटी गरीब महिला आणि इतर लाभार्थ्यांपर्यंत मर्यादित असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.