EVRE उभारणार 10 हजार चार्जिंग स्टेशन्स; तरुणांसाठी रोजगाराची नवी संधी

electric bike
electric bikeesakal
Updated on
Summary

देशात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या दरामुळे लोक आता इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देत आहेत.

- शिल्पा गुजर

व्यवसायाची संधी (Business Opportunity): इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगची सुविधा देणाऱ्या ईवीआरईने (EVRE)पुढच्या दोन वर्षात देशभरात 10,000 चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी स्मार्ट पार्किंग सोल्युशन्स ब्रँड पार्क प्लससोबत (Park +) करार केला आहे. या दिर्घकालीन भागीदारीमध्ये मालवाहतूक वाहने आणि इतर वाहनांसाठी स्मार्ट चार्जिंग आणि पार्किंग केंद्रे उभारण्यासाठी आणि जागा सुरक्षित करण्यासाठीच्या सहयोगाचा समावेश आहे.

electric bike
HDFCकडून 'या' दराने मिळतंय फेस्टिव्ह होम लोन! ऑफर 31 ऑक्टोबरपर्यंतच

देशात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या दरामुळे लोक आता इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देत आहेत. सरकारही इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी नोंदणी शुल्क माफ करण्यासारख्या अनेक ऑफर देत आहे. ऑटो कंपन्यांनी आता इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित केले आहे आणि नवीन EV मॉडेल सादर करत आहेत. अशा परिस्थितीत आता चार्जिंग स्टेशन उघडून कमाई करण्याची मोठी संधी आहे.

या कराराअंतर्गत EVचार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर सुविधेची रचना, बांधकाम, स्थापना, ऑपरेशन याकडे लक्ष देईल, तर पार्क+ रिअल इस्टेट व्यवस्था आणि व्यवस्थापन करेल अशी माहिती कंपनीने एका निवेदनातून दिली आहे.

electric bike
टाटा, जिंदाल, हिंडाल्कोच्या शेअर्समध्ये मोठी घसरण!

चार्जिंग स्टेशन उघडण्यासाठी प्रशिक्षण घ्या

देशात इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उघडण्यासाठी सरकारने एक नवीन योजना आखली आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MSME)या योजनेद्वारे तरुणांना प्रशिक्षण देत आहे. प्रशिक्षणादरम्यान, तुम्हाला चार्जिंग स्टेशनची संपूर्ण माहिती मिळेल. यासोबतच काम करण्याचे नवीन तंत्रही शिकवले जाईल. प्रशिक्षणामध्ये तुम्हाला यंत्रणा, सौर शक्तीवर चालणारे इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, व्यवसाय, सौर पीव्ही चार्जिंग कनेक्टिव्हिटी लोड, वीज दर इत्यादींची माहिती दिली जाते. या प्रशिक्षणात तुम्हाला या व्यवसायाची संपूर्ण माहिती दिली जाईल. यानंतर तुम्ही चार्जिंग स्टेशन उघडून चांगले पैसे कमवू शकता.

electric bike
ITC Share: 3 दिवसांत 11 टक्क्यांची वाढ! 52आठवड्यात उच्चांकावर शेअर्स

चार्जिंग स्टेशनशी संबंधित महत्त्वाचे नियम जारी

नीति आयोगाने इलेक्ट्रिक वाहनांचे (EVs)चार्जिंग नेटवर्क उभारण्यासाठी धोरणे आणि निकष मांडण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक संस्थांना एक नवीन हँडबुक जारी केले आहे. हे हँडबुक इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर स्थापित करण्यासाठी नीति आयोग, ऊर्जा मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, ऊर्जा कार्यक्षमता ब्यूरो आणि वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट इंडिया यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे.

या दशकाच्या अखेरीस सर्व व्यावसायिक (Commercial)कार्सपैकी 70 टक्के, 30 टक्के खासगी कार, 40 टक्के बस आणि 80 टक्के दुचाकी आणि तीन चाकी इलेक्ट्रिक वाहने बनवण्याचे भारताचे लक्ष्य आहे.

electric bike
दिवसाला गुंतवा 233 रुपये आणि मिळवा 17 लाख, LICची नवी योजना

चार्जिंग स्टेशन कसे उघडायचे?

अनेक कंपन्या ईव्ही चार्जिंग स्टेशन उघडण्यासाठी फ्रँचायझी देतील. या कंपन्यांकडून फ्रँचायझी घेऊन तुम्ही चार्जिंग स्टेशन उघडू शकता. इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन बसवण्यासाठी सुमारे 4 लाख रुपये खर्च केले जातील असा अंदाज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()