FD Interest Rates : या ५ बँका FDवर देत आहेत ७ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज

बँक ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के जास्त व्याजदर देत आहे. बँकेने 13 जून 2022 रोजी अखेरचे व्याजदर बदलले.
FD Interest Rates
FD Interest Ratesgoogle
Updated on

मुंबई : आजही मोठ्या संख्येने भारतीयांसाठी एफडी हा पसंतीचा गुंतवणूक पर्याय आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदरात लक्षणीय वाढ केली आहे. त्यामुळे एफडीकडे लोकांचे आकर्षण पुन्हा वाढले आहे. (FD Interest Rates)

तथापि, बहुतेक सरकारी आणि खासगी बँका अजूनही FD वर महागाईला मारणारा परतावा देत नाहीत. जूनमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर किरकोळ घसरून 7.01 टक्क्यांवर आला. जेव्हा तुम्ही FD मध्ये गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला महागाई दरापेक्षा जास्त परतावा मिळणे चांगले असते. आज आम्ही तुम्हाला स्मॉल फायनान्स बँकांच्या अशाच काही एफडींबद्दल सांगणार आहोत, ज्या चांगला परतावा देत आहेत.

FD Interest Rates
Business : कमी पैशांत सुरू करा हे उद्योग; लाखोंची होईल कमाई

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक

ही बँक सध्या सामान्य ग्राहकांना 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर 7.20 टक्के परतावा देत आहे. हा परतावा FD वर 990 दिवस आणि 42 महिने व एक दिवस ते 60 महिने अशा २ मॅच्युरिटी कालावधीच्या एफडीवर आहे. त्याच वेळी, बँक ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के जास्त व्याजदर देत आहे. बँकेने 13 जून 2022 रोजी अखेरचे व्याजदर बदलले.

जन स्मॉल फायनान्स बँक

ही स्मॉल फायनान्स बँक सर्वसामान्य नागरिकांना 7.25 ते 7.35 पर्यंत FD वर उच्च व्याजदर देत आहे. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीवर 8.05 टक्के ते 8.15 टक्के व्याजदर दिला जात आहे. सर्वसामान्य आणि ज्येष्ठ नागरिकांना एक वर्ष ते ५ वर्षांपर्यंतच्या एफडीवर हा बंपर परतावा मिळू शकतो.

FD Interest Rates
२५ पैशांचे नाणे बनवेल तुम्हाला लखपती

ESAF स्मॉल फायनान्स बँक

ही बँक सर्वसामान्य नागरिकांना FD वर ७.२५% परतावा देत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना ७.७५ टक्के व्याजदर दिला जात आहे. हा व्याजदर 2 वर्षे ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर दिला जात आहे.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक

ही स्मॉल फायनान्स बँक सध्या ग्राहकांना ७.४९ टक्के व्याजदर देत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना ७.९९ टक्के व्याजदर दिला जात आहे. हा व्याजदर ग्राहकांना 999 दिवसांच्या FD वर दिला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.