Festive Offer : ही क्रेडीट कार्ड कंपनी देत आहे २२.५ टक्क्यांपर्यंत कॅशबॅक

विविध प्रकारच्या अत्यंत लोकप्रिय वस्तूंवर आकर्षक ऑफर देण्यात येत आहेत.
festive offer
festive offergoogle
Updated on

मुंबई : SBI कार्ड, या बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागाने सणासुदीच्या हंगामात फेस्टिव्ह ऑफर 2022 लाँच करण्याची घोषणा केली आहे. यात ग्राहकांसाठी अनेक आकर्षक ऑफर्स आणल्या आहेत. हे 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत सुरू राहील.

बँकेचे म्हणणे आहे की सणासुदीच्या ऑफर अंतर्गत, ग्राहक विविध भागीदार ब्रँडवर 22.5% पर्यंत कॅशबॅक घेऊ शकतात. (SBICARD)

festive offer
Smartphone : एका चार्जमध्ये ७ दिवस चालेल हा waterproof smartphone

1600 पेक्षा जास्त ऑफर

SBI कार्डनुसार, त्यांच्या ग्राहकांना सणासुदीच्या काळात टियर 1, टियर 2 आणि टियर 3 शहरांमधील विविध ऑनलाइन आणि ऑफलाइन व्यवहारांमधून 1600 हून अधिक ऑफर मिळतील. यावेळी, विविध प्रकारच्या अत्यंत लोकप्रिय वस्तूंवर आकर्षक ऑफर देण्यात येत आहेत.

यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल, फॅशन आणि जीवनशैली, दागिने, प्रवास आणि ऑनलाइन मार्केटप्लेस इत्यादींचा समावेश आहे.

22.5% पर्यंत कॅश बॅक

SBI कार्ड ग्राहकांसाठी फेस्टिव्ह ऑफर 2022 मध्ये 2600 शहरांमध्ये 70 पेक्षा जास्त राष्ट्रीय ऑफर तसेच 1550 प्रादेशिक आणि हायपरलोकल ऑफर समाविष्ट आहेत. उत्सव ऑफर अंतर्गत, ग्राहक विविध भागीदार ब्रँडवर 22.5% पर्यंत कॅशबॅक मिळवू शकतात.

festive offer
जिओच्या ३ रिचार्ज प्लॅनच्या किंमतींत वाढ; असे आहेत तपशील

Amazon सह विशेष भागीदारी

SBI कार्डने 'Amazon Great Indian Festival Sale' साठी कंपनीसोबत विशेष भागीदारी केली आहे. SBI कार्ड हे ग्राहकांसाठी प्रमुख प्रस्तावांपैकी एक आहे. हा वर्षातील सर्वात मोठा ऑनलाइन विक्री कार्यक्रम आहे, जो 03 ऑक्टोबर 2022 पर्यंत सुरू राहणार आहे.

याशिवाय, SBI कार्डने आपल्या ग्राहकांसाठी देश-विदेशातील जवळपास 28 आघाडीच्या भागीदार ब्रँड्सच्या सहकार्याने विविध ऑफर्स सादर केल्या आहेत. यामध्ये Flipkart, Samsung Mobiles, Reliance Trends, Pantaloons, Raymonds, LG, Samsung, Sony, HP, MakeMyTrip, Goibibo, Vishal Mega Mart, Reliance Jewels, Caratlane, Hero Motors यांसारख्या सुप्रसिद्ध ब्रँडचा समावेश आहे.

एसबीआय कार्ड्सचे एमडी आणि सीईओ राम मोहन राव अमारा म्हणतात की ग्राहक सणांच्या काळात जास्त खर्च करतात. यामध्ये पूर्वनियोजित आणि अनियोजित अशा दोन्ही खर्चांचा समावेश आहे.

१.२५ लाख स्टोअर्सवर ईएमआय सुविधा

SBI कार्ड ग्राहकांसाठी EMI सुविधा आता भारतातील १.६ लाख व्यापारी आणि २.२५ लाखांहून अधिक स्टोअर्सवर उपलब्ध आहे. त्याचे ग्राहक २५ हून अधिक इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाइल ब्रँडवर 'नो कॉस्ट ईएमआय' घेऊ शकतात. ग्राहक निवडक प्रादेशिक स्तरावरील व्यापाऱ्यांकडून EMI व्यवहारांवर 15% कॅशबॅक देखील घेऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.