भारतीयांच्या स्विस बँकेतील पैशात तिपटीने वाढ? केंद्र सरकार म्हणालं...

भारतीयांच्या स्विस बँकेतील पैशात तिपटीने वाढ? केंद्र सरकार म्हणालं...
Updated on

नवी दिल्ली : एकीकडे कोरोनामुळे लोकांची अवस्था खराब झालेली असताना, दुसरीकडे स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये भारतीयांचा पैसा वाढत असल्याची माहिती समोर येत आहे. स्विस बँकांमध्ये भारतीय लोक आणि भारतीय कंपन्याचा जमा पैसा 2020 मध्ये वाढून 2.55 अब्ज स्विस फ्रँक म्हणजेच जवळपास 20,700 कोटी रुपयांहून अधिक झाला आहे. काल गुरुवारी स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती केंद्रीय बँकेने जाहीर केलेल्या वार्षिक आकडेवारीमधून ही माहिती समोर आली होती.

मात्र, याबाबतचं हे वृत्त अर्थ मंत्रालयाने धुडकावून लावलं आहे. अर्थ मंत्रालयाने स्विस बँकेमधील ठेवींमध्ये वाढ अथवा घट झालीय का याची पडताळणी करण्यासाठी स्विस बँकेच्या अधिकाऱ्यांकडून माहिती मागवली आहे. याबाबतची माहिती आज शनिवारी मंत्रालयाने आपल्या ट्विटर हँडलवरुन दिली आहे. या ट्विटमध्ये मंत्रालयाने एक प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटलंय की, काल शुक्रवारी माध्यमांमध्ये अशा बातम्या आल्या आहेत की, 2020 मध्ये स्विस बँकांमध्ये जमा झालेले भारतीयांचे पैसे हे 20,700 कोटी रुपयांपर्यंत गेले आहेत. 2016 मध्ये ही रक्कम 6,625 कोटी इतकी होती. एकीकडे कोरोनाचं अभूतपूर्व संकट उभं असताना दुसरीकडे भारतीयांच्या पैशात मात्र तिपटीने वाढ झाली असल्याची माहिती माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. इतकंच नव्हे तर गेल्या 13 वर्षांच्या काळातील ही सर्वांत मोठी रक्कम असल्याचंही माध्यमांमधील बातम्यांमध्ये सांगण्यात आलं आहे.

भारतीयांच्या स्विस बँकेतील पैशात तिपटीने वाढ? केंद्र सरकार म्हणालं...
भयानक! कोव्हिशिल्डनंतर अवघ्या पाच मिनिटांत दिली कोव्हॅक्सीन

मंत्रालयाने पुढे म्हटलंय की, बँकांनी स्विस नॅशनल बँक अर्थात एसएनबीकडे नोंदवलेली अधिकृत आकडेवारी आणि स्वित्झर्लंडमध्ये भारतीयांनी ठेवलेली ही रक्कम काळा पैसा असल्याचं दर्शवत नाही. तसेच, या आकडेवारीमध्ये अनिवासी भारतीयांचे अथवा इतर लोकांद्वारे तिसऱ्याच संस्थांच्या नावावर स्विस बँकेत पैसे असू शकतात, असेही मंत्रलयाने स्पष्ट केलं आहे. भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये 2012 मध्ये तसेच 2020 मध्ये त्यांच्या नागिकांच्या आर्थिक माहितीची देवाणघेवाण केली होती. वित्तीय खात्यांच्या माहितीच्या देवाणघेवाणीसाठी सध्याची कायदेशीर व्यवस्था पाहता भारतीय रहिवाशांच्या अघोषित उत्पन्नांपेक्षा स्विस बँकांमधील ठेवी वाढण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही, असंच मंत्रालयानं नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.