Digital Loan : डिजिटल कर्जांबाबत नवे नियम  जाहीर

डिजिटल कर्ज घेताना किंवा घेतल्यानंतर कर्जदारांची फसवणूक होत असल्यामुळे रिझर्व्ह बँकेने या संदर्भातील काही नवे प्रस्तावित नियम जाहीर केले आहेत.
Digital loan
Digital loanSakal
Updated on

मुंबई : डिजिटल कर्ज घेताना किंवा घेतल्यानंतर कर्जदारांची फसवणूक होत असल्यामुळे रिझर्व्ह बँकेने या संदर्भातील काही नवे प्रस्तावित नियम जाहीर केले आहेत. यात कर्ज घेणाऱ्याच्या तक्रारी सोडविण्यासाठी यंत्रणा, त्याला सुस्पष्ट माहिती देणे, कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट बँक खात्यातूनच व्यवहार होणे आदींचा समावेश आहे. याबाबत निकष सुचवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मागील वर्षी जानेवारीमध्ये कार्यगटाची नियुक्ती केली होती. त्यांनी सुचविलेल्या कठोर उपायांपैकी काही बाबी रिझर्व्ह बँकेने स्वीकारल्या आहेत. कर्ज घेणाऱ्यांनी काही तक्रार नोंदवली व कर्ज देणाऱ्या संस्थेने ती एका महिन्यात सोडवली नाही तर कर्ज घेणारी व्यक्ती रिझर्व्ह बँकेच्या लेखापाल योजनेद्वारे तक्रार नोंदवू शकते. कर्ज देणाऱ्या संस्थेला कर्ज घेणारी व्यक्ती आपली एखादी माहिती देण्यास नकार देऊ शकते किंवा अशी माहिती वापरण्यास आधी दिलेली संमती रद्द करण्याचा हक्क किंवा असा तपशील नष्ट करण्याचाही हक्क कर्ज घेणाऱ्याला असावा असेही म्हटले आहे.

प्रमुख नियम...

  • कर्ज देणे व कर्जाची परतफेड कर्जदाराचे आणि कर्जदार संस्थेचे बँक खाते यांच्यामार्फतच झाले पाहिजे.

  • कोणत्याही मध्यस्थामार्फत किंवा एकत्रित पूलअकाउंटमधून पैसे जाता कामा नयेत.

  • कर्जाचा करार करण्यापूर्वी कर्ज घेणाऱ्याला सर्व तथ्ये स्पष्ट करणारे स्टेटमेंट दिले पाहिजे.

  • कर्जापोटी सर्व वार्षिक खर्च किती आहेत तेही त्यात स्पष्ट केले पाहिजे.

  • कर्ज घेणाऱ्याच्या संमतीशिवाय कर्जाची रक्कम आपोआप वाढवली जाऊ नये.

  • एकदा कर्ज घेतल्यावर लगेच ते एकरकमी फेडायचे असल्यास कोणताही दंड न आकारता ते किती काळात फेडता येईल याचाही तपशील द्यायला हवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.