Gold Import : सोन्याच्या आयातीत विक्रमी वाढ

रत्ने आणि दागिने यांची निर्यात
finance Record rise in gold imports rbi Export of Gems and Jewellery mumbai
finance Record rise in gold imports rbi Export of Gems and Jewellery mumbaisakal
Updated on

मुंबई : एप्रिल ते जुलै २०२२ या काळात सोन्याची आयात गेल्या वर्षातील याच काळाच्या तुलनेत ६.४ टक्क्यांनी वाढली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत, म्हणजेच एप्रिल ते जुलै या काळात १२.९ अब्ज डॉलरचे सोने आयात करण्यात आले आहे. गेल्या वर्षी याच काळात १२ अब्ज डॉलरचे सोने आयात केले गेले होते. सोन्याच्या किरकोळ मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे सोन्याची आयात वाढल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने सांगितले आहे. जगात भारत हा चीन नंतर सोन्याचा सर्वात मोठा दुसरा आयातदार देश आहे. देशातील सराफांकडून दागिने घडवण्यासाठी लागणाऱ्या सोन्याचा मुख्यतः प्रभाव या आयातीवर असतो. सोन्याची आयात जरी मोठ्या प्रमाणावर झाली असली, तरी रत्ने व दागिने यांची निर्यातही एप्रिल ते जुलै या काळात झाली आहे. या काळात रत्ने व दागिने यांच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या मानाने ७ टक्के वाढ होऊन ती १३.५ अब्ज डॉलर इतकी नोंदवली गेली आहे.

साठ्यात वाढ

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, १२ ऑगस्टच्या आठवड्यात सोन्याच्या साठ्याचे मूल्य ३०.५ कोटी डॉलर वाढून ४०.६१ अब्ज डॉलर झाले आहे. या आठवड्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे असलेल्या स्पेशल ड्रॉइंग राइट्स ठेवी १०.२ कोटी डॉलरने वाढून १८.१३ अब्ज डॉलर झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये ठेवलेल्या देशांचा चलन साठा ४.९९ अब्ज डॉलरपेक्षा जास्त झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.