फ्लिपकार्ट होलसेल देत आहे 2 लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज

Loan
Loan
Updated on
Summary

या नवीन योजनेमुळे किराणा दुकानांना आयडीएफसी फर्स्ट बँक आणि इतर फिनटेक संस्थांच्या भागीदारीत एंड-टू-एंड डिजिटल ऑन बोर्डिंगद्वारे शून्य किंमतीत कर्ज घेणे शक्य होते.

फ्लिपकार्ट होलसेलने (Flipkart Wholesale)एक नवीन क्रेडिट स्किम सुरू केली आहे. किराणा दुकानदार (kiranas)आणि किरकोळ विक्रेते (retailers)त्यांच्या कामाच्या भांडवलाच्या (Working Capital)गरजा पूर्ण करण्याशिवाय त्यांचा व्यवसाय वाढवण्यास ही योजना मदत करेल. फ्लिपकार्ट होलसेल (Flipkart Wholesale)ही वॉलमार्टची मालकी कंपनी फ्लिपकार्टची डिजिटल बी2 बी (बिझनेस टू बिझनेस) बाजारपेठ (Market place)आहे. कंपनीच्या योजनेनुसार व्यापारी थकबाकीशिवाय दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात.

Loan
परदेशात शिक्षण घेणं झालं सोप्प; SBI देतंय कमी दरात कर्ज

14 दिवसांपर्यंत बिनव्याजी कर्ज

फ्लिपकार्ट होलसेलची क्रेडिट योजना आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या (IDFC FIRST Bank)भागीदारीत किराणा दुकानदारांना भेटेल अशी माहिती कंपनीने दिली. यात'ईझी क्रेडिट'चाही समावेश आहे. देशातील किराणा व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हा एक चांगला उपक्रम असल्याचं कंपनीचे म्हणणे आहे. या नवीन योजनेमुळे किराणा दुकानांना आयडीएफसी फर्स्ट बँक आणि इतर फिनटेक संस्थांच्या भागीदारीत एंड-टू-एंड डिजिटल ऑन बोर्डिंगद्वारे शून्य किंमतीत कर्ज घेणे शक्य होते. या योजनांमध्ये 5,000 ते 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज असेल. त्यासाठी 14 दिवस कोणतेही व्याज आकारले जाणार नाही. म्हणजे व्याजमुक्त कालावधी हा 14 दिवसांपर्यंतच असेल.

Loan
कर्ज फेडणाऱ्यांना सरकार 50 हजार देणार होतं, त्याचं काय झालं?

बी 2 बी (बिझनेस टू बिझनेस) रिटेल

किराणा आणि किरकोळ विक्रेत्यांसाठी व्यवसाय सुलभ करणे आणि त्यांना वाढण्यास मदत करणे हे ही नवी योजना भारतातील किराणा दुकानांना येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी आणल्याचे आणि कंपनीचे हेच मुख्य ध्येय असल्याचे फ्लिपकार्ट होलसेलचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख आदर्श मेनन यांनी म्हटले. त्यांचा रोख प्रवाह (Cash Flow)व्यवस्थापित (Managment)करण्यास आणि आमच्या प्लॅटफॉर्मवर त्यांचा खरेदीचा अनुभव सुधारण्यास मदत करेल असेही आदर्श मेनन म्हणाले. बी2बी रिटेल इकोसिस्टमला डिजिटलायझेशनचा फायदा होईल.

Loan
नियमित कर्ज फेडणाऱ्या सभासदांना मिळणार वाढीव पीककर्ज

फ्लिपकार्ट होलसेलचा 15 लाखांपेक्षा जास्त ग्राहक

फ्लिपकार्ट होलसेलचे देशभरात15 लाखांहून जास्त सदस्य आहेत. यात किराणा दुकानदार, किरकोळ विक्रेते, हॉटेल्स, रेस्टोरंट्स, कॅफेटेरियासह कार्यालये आणि संस्थांचाही समावेश आहे. भारतातील किराणा दुकानांचा देशाच्या किरकोळ विभागातील (Retail Segment)वाटा दोन तृतीयांशपेक्षा जास्त आहे. हा पारंपारिक व्यापार (Traditional Trade)आता किरकोळ स्वरूप (Retail Format)आणि व्यवसाय मॉडेल (Business Model)म्हणून विकसित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.