एम्प्लॉयी प्रॉव्हिडंट फंडच्या (EPF) ग्राहकांना (subscriber) अधिकच्या फायद्यासाठी आपले नॉमिनेशन डिजिटल पद्धतीने करायचे आहे. याबाबत EPFO ने एक नोटिफिकेशन जारी केले आहे, आणि सगळ्या ग्राहकांना ई नॉमिनेशन लवकरात लवकर भरण्यास सांगतिले आहे, जेणेकरुन खातेदाराच्या कुटुंबालाही सोशल सिक्युरिटी मिळेल. EPFO त्याच्या खातेदारांना निवृत्ती भत्ता आणि पेन्शनसारख्या सुविधा देतं. एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबाला पेन्शन आणि विम्याच्या सोयी उपलब्ध करुन दिल्या जातात.
डिजिटल माध्यमातून EPF नॉमिनेशन फाइल करण्यासाठी खातेदारांना EPFO च्या वेबसाइटवर जोकर सर्व्हिसेजचा पर्याय क्लिक करावा लागेल. यानंतर फॉर एंप्लॉयिज या पर्यायावर पर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला रिडायरेक्ट केल्यानंतर Member UAN/Online Service या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर खातेदारांना ऑफिशियल मेंबर e-SEWA पोर्टलवर रिडायरेक्ट केले जाईल. जिथे UAN आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करता येईल.
त्यानंतर खाली आलेल्या तक्त्यामधून (Drop Down Menu) मॅनेज या टॅबवर जात ई नॉमिनेशन निवडायचे आहे. यात हो (Yes) हा पर्याय निवडायचा आणि फॅमिली डिक्लेरेशनला अद्ययावत करायचे आहे. ऍड फॅमिली डिटेल्सलर क्लिक करायचे आणि नॉमिनेशन डिटेल्स निवडून तुम्ही शेअर करायची रक्कम घोषित करु शकता.
यानंतर सेव्ह EPF नॉमिनेशनवर क्लिक करा. पुढच्या पेजवर ई-साइन पर्यायावर क्लिक करा. तुमच्या आधार कार्डशी संबंधित मोबाइल नंबरवर OTP पाठवला जाईल, तो रिकाम्या रकान्यात भरल्यास प्रक्रिया पुर्ण होईल.
EPFO ने नुकतेच एंप्लॉयिज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरंस (EDLI) स्कीमच्या ग्राहकांचे इन्शुरंस बेनेफिट वाढवले आहे, 2.5 लाख रुपये ते 7 लाख रुपये करण्यात आला आहे. आधी ही मर्यादा 2 लाख रुपये ते 6 लाख रुपये इतकी होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.