सायबर हल्ल्यापासून सुरक्षित राहा! वाचा Online Banking साठी 10 टिप्स

ऑनलाइन बँक फसवणुकीच्या घटना दररोज समोर येत आहेत.
online banking
online bankingesakal
Updated on
Summary

ऑनलाइन बँक फसवणुकीच्या घटना दररोज समोर येत आहेत.

बँक ग्राहकांसाठी ऑनलाइन बँकिंगच्या (Online Banking) सुविधेमुळे, व्यवहार अतिशय सोपे आणि सोयीस्कर झाले आहेत. पण सोबतच बँक फसवणुकीचा धोकाही वाढला आहे. ऑनलाइन बँक (Bank) फसवणुकीच्या घटना दररोज समोर येत आहेत. फसवणूक टाळण्यासाठी, बँका त्यांच्या ग्राहकांना ऑनलाइन फसवणुकीबद्दल सतर्क करतात आणि वेळोवेळी सुरक्षा टिप्स देत असतात. यातच युनियन बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना ईमेलद्वारे 10 ऑनलाइन बँकिंग सुरक्षा टिप्स दिल्या आहेत.

online banking
सायबर हल्ल्याच्या भीतीने युक्रेनमधील विद्यार्थ्यांनी बंद केले इंटरनेट

- संशयास्पद पॉप अप पासून सावध रहा

जेव्हाही ग्राहक ब्राउझ करत असतील तेव्हा संशयास्पद पॉप अपपासून सावध रहा. त्यावर क्लिक करु नका

- सुरक्षित पेमेंट गेटवे तपासा

ऑनलाइन पेमेंटमध्ये (Online Payment) सुरक्षेसाठी कायम सुरक्षित पेमेंट गेटवे वापरा. ऑनलाइन पेमेंट करण्यापूर्वी, सुरक्षित पेमेंट गेटवे (URL आणि https://- पॅड लॉक चिन्ह) चेक करा.

- ई-मेल मेसेजद्वारे वेबसाइटवर जाऊ नका

वेबसाइटला भेट देण्यासाठी ई-मेल मेसेजमधील लिंकवर क्लिक करू नका. ई-मेलमधील लिंक व्हायरस किंवा मालवेअर हल्ल्यांचा धोका असू शकतो.

online banking
सायबर गुन्ह्यासाठी स्‍वतंत्र पोलिस ठाणे

- फक्त URL टाइप करून बँकेच्या वेबसाइट ओपन करा

कस्टमर्सने नेहमी त्यांच्या अॅड्रेस बारमध्ये फक्त URL टाइप करून त्यांच्या बँकेच्या वेबसाइटवर लॉग इन केले पाहिजे.

- पासवर्डमध्ये पर्सनल पासफ्रेज वापरा

पासवर्ड तयार करताना नेहमी वैयक्तिक सांकेतिक पासफ्रेज वापरावा. उदा., जर मला लाल रंग आवडला याचा पासवर्ड बनवला, तर iLIke3Red@cOLor तो असा बनवू शकता.

- पिन, कार्ड क्रमांक, सीव्हीव्ही क्रमांक गोपनीय ठेवा

ग्राहकांनी त्यांचा वैयक्तिक ओळख क्रमांक (PIN), पासवर्ड, क्रेडिट, डेबिट कार्ड क्रमांक, CVV क्रमांक आणि इतर सर्व वैयक्तिक डेटा कोणाशीही शेअर करू नका.

online banking
‘एनी डेस्क ॲप’मुळे गेलेली रक्कम ‘सायबर’मुळे परत

- पासबुक, चेकबुक, केवायसी कागदपत्रांची प्रत शेअर करू नका

ग्राहकांनी त्यांच्या बँक पासबुकची प्रत, चेकबुक, बँक स्टेटमेंट, केवायसीसारखे डॉक्युमेंट्स अनोळखी व्यक्तींसोबत किंवा गरज नसलेल्या कोणाशीही शेअर करू नयेत.

- टू फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरा

ऑनलाइन बँकिंगमध्ये करताना अतिरिक्त सुरक्षेसाठी अतिरिक्त सेवा उपलब्ध आहे, त्यात टू फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर करा.

- मोफत भेट,बक्षीस पडू नका

मोफत भेटवस्तू, लकी ड्रॉ, यांच्या फंदात कधीही पडू नका. बक्षिसे किंवा लकी ड्रॉ जिंकण्याच्या नावाखाली तुमचे वैयक्तिक बँक डिटेल्स किंवा संवेदनशील माहिती कोणाशीही शेअर करू नका. अशा ऑफर्समध्ये बँक फसवणूक होण्याचा धोका नेहमीच असतो.

- अनावश्यक अॅप्स किंवा सॉफ्टवेअर ठेवू नका

ग्राहकांनी त्यांच्या वैयक्तिक उपकरणावर अर्थात संगणक, लॅपटॉप, टॅबलेट किंवा मोबाइलवर कोणतेही अनावश्यक किंवा अनावश्यक अॅप किंवा सॉफ्टवेअर कधीही इन्स्टॉल करू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.