आजही आम्ही तुमच्यासाठी कमी गुंतवणुकीचा साध्या सोप्या व्यवसायाची माहिती घेऊन आलो आहोत. तर आम्ही सुपारीच्या लागवडीबद्दल बोलत आहोत. संपूर्ण जगात सुपारीचे उत्पादन भारतात केले जाते. एका आकडेवारीनुसार, जगातील 50 टक्के सुपारीचे उत्पादन भारतात होते. पान गुटख्यापासून ते धार्मिक कामांपर्यंत त्याचा वापर केला जातो.
सुपारीची लागवड कोणत्याही जमिनीत करता येते. त्यातल्या त्यात चिकणमाती माती यासाठी चांगली मानली जाते. सुपारीची झाडे नारळासारखी 50-60 फूट उंच असतात आणि एकदा लागवड केल्यास 7-8 वर्षात फळ मिळायला सुरवात होते आणि अनेक दशके उत्पन्न होत राहाते. (for permanent income Plant betel nut or supari trees at once)
शेती कशी करावी ?
सुपारी लागवडीसाठी नर्सरी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यासाठी सगळ्यात आधी बेडमध्ये बिया तयार केल्या जातात. जेव्हा हे बिया रोपांच्या स्वरूपात तयार होतात, तेव्हा शेतात लावल्या जातात. जिथे झाडे लावली आहेत तिथे पाण्याचा प्रवाह चांगला असावा. जेणेकरून झाडांजवळ पाणी साचणार नाही. पाण्याच्या चांगल्या प्रवाहासाठी लहान नालेही बनवता येतात. जुलैमध्ये सुपारीची लागवड करणे चांगले मानले आहे. कंपोस्टसाठी शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरल्यास चांगले होईल.
किती कमाई होईल ?
सुपारीच्या झाडाला जोडलेली फळे तीन-चतुर्थांश पिकल्यावरच काढावी. सुपारी बाजारात कायमच चांगल्या दराने विकली जाते. त्याची किंमत सुमारे 400 ते 700 रुपये किलोपर्यंत सहज जाते. म्हणजेच एक एकरात सुपारीची लागवड केल्यास भरघोस नफा मिळू शकतो. झाडांच्या संख्येनुसार कोट्यवधी रुपयांपर्यंत नफा होऊ शकतो.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.