2020-21 आर्थिक वर्षात GDP मध्ये 7.3 टक्क्यांची घसरण

gdp
gdp
Updated on

नवी दिल्ली- गेल्या जवळपास दीड वर्षांपासून जगभरात कोरोना थैमान घातल आहे. कोरोना विषाणूमुळे आलेल्या निर्बंधांमुळे जागतिक अर्थचक्राचा गाडा संथ गतीने पुढे जात आहे. अशात या महामारीचा प्रभाव भारतीय अर्थव्यवस्थेवरही पडल्याचं दिसून येत आहे. भारताच्या जीडीपीमध्ये २०२०-२१ आर्थिक वर्षात -7.3% ने घसरण झाली आहे. गेल्या चार दशकांतील ही सर्वात वाईट स्थिती आहे. २०१९-२० आर्थिक वर्षात जीडीपी वाढ ४ टक्के होती. केंद्र सरकारने यासंदर्भातील माहिती दिली आहे. कोरोना महामारीमुळे जीडीपीमध्ये घट होईल, असा अंदाज तज्त्रांनी लावला होता.

गेल्या चार दशकातील भारतीय अर्थव्यवस्थेची ही सर्वात वाईट कामगिरी आहे. अर्थव्यवस्थेची नकारात्मक वाढ झाली आहे. याशिवाय वित्तीय वर्षाच्या चौथ्या तिमाहीत 1.6 टक्क्यांची अल्प वाढ झाली आहे. एनएसओने सोमवारी जीडीपी Gross Domestic Product (GDP) जाहीर केला. देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लादण्यात आला. त्यानंतर जूलै महिन्यापासून अनलॉकला सुरुवात झाली. पण, अर्थव्यवस्थेला लागलेले ग्रहन संपण्याचे नाव घेत नाहीये.

जानेवारी-मार्चदरम्यान लॉकडाऊन उठवण्यात आला होता. तरीही चौथ्या वित्तीय वर्षात केवळ १.६ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत आलबेल नसल्याचं दिसतंय. पहिल्या तिमाहीत भारतीय जीडीपीमध्ये 24.38 टक्क्यांची घट पाहायला मिळाली होती. कोरोना महामारीचा हा परिणाम होता. जीडीपी 135.13 लाख कोटींचा स्तर गाठण्याची शक्यता आहे. तो 145.69 लाख कोटींचा स्तर गाठेल, असा अंदाज लावण्यात आला होता.

gdp
मुंबईतील गर्दी कायम राहिल्यास निर्बंध वाढवावे लागतील- मुख्यमंत्री

गेल्या वर्षी जेव्हा कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा अर्थव्यवस्थेला मोठा दणका बसला होता. देशात तांत्रिकदृष्ट्या मंदी आली होती. सलग दोन तिमाही एप्रिल-जून आणि जुलै-सप्टेंबर या कालावधी भारताच्या जीडीपीमध्ये घसरण बघायला मिळाली होती. जूनच्या तिमाहीत तर जीडीपी तब्बल 24 टक्के घसरला होता. त्यानंतर डिसेंबरच्या तिमाहीत 0.4 टक्क्यांची किरकोळ वाढ बघायला मिळाली होती.

अनेक संस्थांनी जीडीपीमध्ये मोठी घसरण बघायला मिळेल असा अंदाज व्यक्त केला होता. दोन तिमाहीमध्ये झालेल्या घसरणीमुळे आर्तिक वर्ष 2020-21 मध्ये घसरण होईल असं म्हटलं होतं. केंद्र सरकारने अंदाज व्यक्त करताना म्हटलं होतं की, आर्थिक वर्षात 2021-21 मध्ये जीडीपीमध्ये 8 टक्के घसरण होऊ शकते. तर रेटिंग एजन्सी आयसीआरएने असा अंदाज व्यक्त केला होता की, पूर्ण आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत 7.3 टक्के घसरण होईल. मार्चच्या तिमाहीत जीडीपीमध्ये 2 टक्के वाढ होईल असंही सांगण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.