Forbes List : जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत निर्मला सीतारामन; पहिल्या स्थानावर कोण?

फोर्ब्सने जगातील 100 शक्तिशाली महिलांची यादी जाहीर केली आहे.
Nirmala Sitharaman
Nirmala Sitharamansakal
Updated on

फोर्ब्ज वेळोवेळी देशातल्या आणि जगातल्या श्रीमंत, ताकदवान लोकांची यादी जाहीर करत असते. या यादीत नावाचा समावेश होणं फार सन्मानाचं समजलं जातं. यावेळी फोर्ब्सने जगातील 100 शक्तिशाली महिलांची यादी जाहीर केली आहे.

देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, बायोकॉनचे कार्यकारी अध्यक्ष किरण मुझुमदार शॉ आणि Nykaa च्या संस्थापीका फाल्गुनी नायर यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. दरवर्षी जाहीर होणाऱ्या या यादीत यावेळी 6 भारतीय महिलांनी स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.

हेही वाचा : Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!

फोर्ब्सच्या यादीनुसार, यावेळी निर्मला सीतारामन 36व्या स्थानावर आहेत. सीतारामन यांचा या यादीत सलग चौथ्यांदा समावेश झाला आहे. यापूर्वी 2021 मध्ये त्या 37 व्या क्रमांकावर होत्या. 2020 मध्ये त्या 41व्या आणि 2019 मध्ये 34व्या स्थानावर होत्या.

युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयन यांनी जगातील 100 शक्तिशाली महिलांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. युक्रेन युद्धादरम्यानचे त्यांचे नेतृत्व आणि कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांना हे पद मिळाले आहे.

Nirmala Sitharaman
Balaji Wafers Success : थिएटरमध्ये वेफर्स विकणाऱ्यानं तयार केलाय कोट्यवधींचा ब्रँड

यावर्षी मुझुमदार-शॉ 72व्या, तर नायर 89व्या क्रमांकावर आहेत. या यादीतील इतर भारतीयांमध्ये एचसीएल टेकचे चेअरपर्सन रोशनी नादर मल्होत्रा ​​53 व्या स्थानावर, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) च्या अध्यक्षा माधबी पुरी बुच 54 व्या स्थानावर आणि स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL) च्या अध्यक्षा सोमा मंडल यांनी 67 वे स्थान मिळवले आहे.

गेल्या वर्षीही रोशनी नादर मल्होत्रा, मुझुमदार-शॉ आणि नायर यांनी या यादीत अनुक्रमे 52वे, 72 वे आणि 88वे स्थान मिळवले होते. फोर्ब्सच्या वेबसाइटनुसार या यादीत 39 सीईओ आणि 10 राष्ट्रप्रमुखांचाही समावेश आहे. याशिवाय यामध्ये 11 अब्जाधीशांचा समावेश आहे, ज्यांची एकूण संपत्ती 115 डॉलर अब्ज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.