भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांनी जगातील श्रीमंतांच्या यादीत मोठा बदल केलाय.
Gautam Adani News : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी जगातील श्रीमंतांच्या यादीत मोठा बदल केलाय. फोर्ब्स अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, गौतम अदानी यांनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांना मागं टाकून जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. अदानी यांची एकूण संपत्ती 113 अब्ज डॉलरवर पोहोचलीय. तर, बिल गेट्स 102 अब्ज संपत्तीसह या यादीत पाचव्या स्थानावर आहेत.
फोर्ब्स अब्जाधीश निर्देशांकानुसार (Forbes Billionaires Index), संपत्तीच्या बाबतीत जगातील केवळ तीन उद्योगपती अदानींच्या पुढं आहेत. या यादीत टेस्लाचे (Tesla) संस्थापक इलॉन मस्क (Elon Musk) पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 229 अब्ज डॉलर आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर फ्रेंच लक्झरीचे (LMVH) मालक बर्नार्ड अर्नॉल्ट (Bernard Arnault) आणि त्यांचं कुटुंब आहे. अर्नॉल्ट यांची एकूण संपत्ती 145 अब्ज डॉलर आहे. तर, अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे (Amazon) संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. बेझोस यांची एकूण संपत्ती 136 अब्ज आहे.
भारतासह आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा टॅग दीर्घकाळ धारण केलेले मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे संपत्तीच्या बाबतीत अदानींच्या तुलनेत सतत मागे पडत आहेत. फोर्ब्स बिलियनेअर इंडेक्सनुसार, अंबानी-अदानी यांच्यातील हे अंतर 26 बिलियनपेक्षा जास्त झालं असून अंबानी यांची एकूण संपत्ती 87 अब्ज डॉलर आहे. अदानी समूहाचे (Adani Group) प्रमुख गौतम अदानी हे वाढत्या संपत्तीच्या बाबतीत आघाडीवर आहेत. 2022 मध्ये त्यांची संपत्ती सुमारे 23 अब्ज वाढलीय. जी जगातील सर्वात जास्त आहे. 2021 आणि 2020 मध्ये अदानी यांच्या संपत्तीत 40-40 अब्ज डॉलरची वाढ झाली होती.
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये वाढ : अदानींच्या संपत्तीत वाढ होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सातत्यानं होणारी वाढ. गेल्या दोन वर्षांत अदानी समूहाच्या शेअर्सचे मूल्य अनेक पटींनी वाढलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.