Layoffs 2023 : आता सर्वात मोठ्या कार कंपनीचा कर्मचाऱ्यांना धक्का! 3,800 कर्मचाऱ्यांना बसवणार घरी, कारण...

कंपनीने यापूर्वी जानेवारी 2023 मध्येही मोठ्या प्रमाणात कर्मचारी केली होती.
Layoffs 2023
Layoffs 2023Sakal
Updated on

Ford Layoffs 2023 : अमेरिकेतील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी फोर्डनेही कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. कंपनीने वाढत्या खर्चात कपात करण्यासाठी हे पाऊल उचलले जात असल्याचे म्हटले आहे.

अशा परिस्थितीत, पुढील तीन वर्षांत कंपनीशी संबंधित 3,800 लोक त्यांच्या नोकऱ्या (Ford Layoffs) गमावतील.

जाणून घ्या कोणत्या लोकांना याचा फटका बसेल :

विशेष म्हणजे या कपातीचा युरोपातील कर्मचाऱ्यांवर सर्वाधिक परिणाम होणार आहे. ब्रिटन, जर्मनीसारख्या देशांमध्ये जास्तीत जास्त लोकांना नोकरीवरून काढले जाईल. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कंपनी आता इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित करणार आहे.

अशा स्थितीत कंपनीचा उर्वरित खर्च कमी करण्यासाठी ही मोठी कर्जामचारी कपात जाहीर करण्यात आली आहे.

कंपनीचे म्हणणे आहे की, या फेरबदलात सुमारे 2,300 लोकांना कामावरून कमी केले जाईल, यूकेमध्ये 1,300 आणि उर्वरित युरोपमध्ये सुमारे 200 लोकांना कामावरून कमी केले जाईल.

Layoffs 2023
LIC Policy : एलआयसी देणार ९३ लाख रुपयांचा परतावा; तुम्ही घेतली आहे का ही पॉलिसी ?

कंपनीचे लक्ष इलेक्ट्रिक वाहनांवर :

फोर्ड कंपनी 2025 पर्यंत युरोपमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा विस्तार करण्यासाठी काम करत आहे. अशा स्थितीत या नियोजनात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यापूर्वी, कंपनीने घोषणा केली होती की, ती या वर्षाच्या अखेरीस युरोपमध्ये बनवलेल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारचे उत्पादन सुरू करेल.

अशा परिस्थितीत, कंपनीने आपल्या अभियांत्रिकीमध्ये सुमारे 2,800 लोकांना काढून टाकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आणि उर्वरित 1,000 लोकांना प्रशासनाकडून काढून टाकावे लागेल. तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने कर्मचार्‍यांना काढून टाकले जाईल.

फोर्डचे युरोपमधील व्यवस्थापक मार्टिन सॅन्झडर यांनी कपातीबाबत निवेदन देताना सांगितले की, हा निर्णय कंपनीसाठी खूप कठीण होता, परंतु जगात असलेल्या आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेणे आवश्यक आहे.

यासोबतच कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कंपनी आगामी काळात सर्वतोपरी सहकार्य करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : नेट बँकिंग सुविधा वापरताय? मग हे नक्कीच वाचा...

फोर्डने यापूर्वी जानेवारी 2023 मध्येही मोठ्या प्रमाणात कर्मचारी केली होती. कंपनीने युरोपभर सुमारे 3,200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते.

गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत, कंपनीने 3,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते. कंपनीने 2025 पर्यंत जर्मनीतील सारलूईस प्लांट पूर्णपणे बंद करणार असल्याचे जाहीर केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.