तुम्ही या दोन्ही गोष्टी UAN शिवाय करू शकता.
तुम्हाला तुमच्या EPFO खात्यात पैसे जमा करायचे किंवा काढायचे असतील आणि तुम्ही UAN नंबर विसरला असाल, तर तुम्ही या दोन्ही गोष्टी UAN शिवाय करू शकता. UAN म्हणजेच युनिव्हर्सल अकाउंट नंबर हा 12 अंकी युनिक नंबर असतो. हा एक परमनंट नंबर (Permanant Number) आहे जो एखाद्या व्यक्तीसाठी लाइफ टाइम वॅलिड (Valid) असतो. कोणताही एम्प्लॉयर UAN नंबर जनरेट करू शकतो.
UAN शिवाय PF बॅलेन्स कसा जाणून घ्यावा ?
1. epfindia.gov.in वर लॉग इन करा
2. यानंतर, 'Click Here to Know your EPF Balance' वर क्लिक करा.
3. यानंतर तुम्हाला epfoservices.in/epfo/ च्या पेजवर रिडायरेक्ट केले जाईल, इथे "Member Balance Information" या पर्यायावर क्लिक करा.
4. यानंतर तुमचे राज्य (State) निवडा, तुमच्या EPFO ऑफिस लिंकवर क्लिक करा.
5. आता इथे पीएफ खाते क्रमांक (PF Account Number), नाव आणि रजिस्टर्ड मोबाइल नंबर टाका.
6. यानंतर सबमिटवर (Submit) क्लिक करा आणि तुम्हाला पीएफ बॅलेन्स दिसेल.
यानंतर तुमचा UAN ऍक्टिवेट होईल. तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नंबर आणि पासवर्ड मिळेल. UAN सक्रिय झाल्यानंतर 6 तासांनंतरच तुम्ही पीएफ बॅलेन्स तपासू शकता. याशिवाय, ईपीएफ सदस्य यूएएनच्या (UAN) मदतीने एसएमएस किंवा कॉलद्वारे बॅलेन्स तपासू शकतात. यासाठी, तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 7738299899 वर एसएमएस करावा लागेल. त्यात EPFOHO UAN हा मजकूर लिहून मेसेज करा. आता EPFO तुम्हाला उत्तर देईल आणि तुमची बॅलेन्स सांगेल.
तुमच्याकडे UAN नंबर नसला तरीही तुम्ही कॉलद्वारे EPFO बॅलन्स तपासू शकता. यासाठी तुमचा मोबाईल नंबर खात्यावर नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी तुम्ही 011-229014016 या क्रमांकावर मिसकॉल करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.