इक्विटी मार्केटमध्ये FPI ची फक्त 986 कोटींची गुंतवणूक

Investment
InvestmentSakal
Updated on
Summary

फॉरेन पोर्टफोलियो इनव्हेस्टर्सची (FPI) एकूण गुंतवणूक 14,480 कोटी रुपयांची आहे.

फॉरेन पोर्टफोलियो इनव्हेस्टर्सने (FPI) ऑगस्टमध्ये देशाच्या इक्विटी मार्केटमध्ये केवळ 986 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. डिपॉझिटरीजच्या डेटानुसार, FPI ने इक्विटीमध्ये 986 कोटी रुपयांची खरेदी केली आणि कर्ज विभागात त्यांची गुंतवणूक 13,494 कोटी रुपये होती. म्हणजेच फॉरेन पोर्टफोलियो इनव्हेस्टर्सची (FPI) एकूण गुंतवणूक 14,480 कोटी रुपयांची आहे.

Investment
वर्षभरात दुसऱ्यांदा पगारवाढ, जाणून घ्या कोणती आहे 'ही' कंपनी

जुलैमध्ये या गुंतवणुकदारांनी 7,273 कोटी रुपयांची विक्री केली होती. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने (American Federal Reserve) पतधोरण कडक करण्याचे संकेत दिल्यापासून इक्विटी बाजारात (Iquity Market) परकीय गुंतवणुकीचा कल कमकुवत असल्याचे मॉर्निंगस्टार इंडियाचे असोसिएट डायरेक्टर (Associate Director of MorningStar India) हिमांशू श्रीवास्तव म्हणाले.

Investment
एचडीएफसी बँकेला ८७५८ कोटींचा नफा 

र्थिक सुधारणा, लॉकडाऊन शिथिलता, लसीकरणाची वाढती गती, चीनमधील बाजारपेठ नवीन उच्चांक गाठत असतानाच दुसरीकडे चीनमध्ये नियामक (Regulators) कडक असूनही देशाच्या इक्विटी मार्केटमध्ये (Iquity Market) गुंतवणुकीबाबत फॉरेन पोर्टफोलियो इनव्हेस्टर्स (FPI) सावध आहे.

Investment
तुमच्या SIP ला द्या Top-Up; फायदा होईल दुप्पट, कॅलक्युलेटर वर करा चेक...

दुसरीकडे इतर उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये (Emerging Markets) त्यांची गुंतवणूक सुरू आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी तैवान, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया आणि फिलिपाईन्समधील बाजारपेठांमध्ये खरेदी वाढवली आहे. फेडरल रिझर्व्हच्या धोरणातील बदलांमुळे बाजारावर दबाव येऊ शकतो तसेच उच्च मूल्यांकनामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी जास्त पैसे ठेवण्याची शक्यता कमी असल्याचे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे (Geojit Financial Services) मुख्य गुंतवणूक धोरणकार व्ही. के. विजयकुमार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.