आपल्या प्रत्येकाच्या घरात किंवा बँकेच्या लाॅकरमध्ये काही प्रमाणात का होईना सोनं असतंच. ते पारंपरिक दागिन्यांच्या स्वरुपात असेल किंवा चित्रपटांमध्ये दाखवतात तसा सोन्याच्या 'बिस्किटां'च्या किंवा गोल्ड बारच्या स्वरुपात. घरातले दागिने हा तसा 'संवेदनशील' विषय आहे, मात्र तरीपण केवळ कल्पना करा ही तुमच्या घरात, लाॅकरमध्ये किंवा अन्य 'गुप्त' ठिकाणी 'पडून' राहिलेल्या (दागिन्यांव्यतिरिक्त) सोन्याचा व्यवहार जर तुम्ही सहजपणे करू शकलात तर?
भांडवली बाजार नियामक मंडळ म्हणजे सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (Securities and Exchange Board of India) अर्थात सेबीने गोल्ड एक्सचेंज स्थापन करण्याचा विचार मांडला आहे. म्हणजे जसं स्टाॅक एक्सचेंजच्या माध्यमातून तुम्ही व्यवहार करता तसंच सोन्याशी संबंधित व्यवहार या गोल्ड एक्सचेंजमधून होतील. (SEBI proposes framework for gold exchange, suggests trading in e-gold receipts)
गोल्ड एक्सचेंजमधील व्यवहार म्हणजे नेमके काय?
तुमच्या मालकीचं सोनं कोणत्यातरी ठिकाणी पडून राहण्यापेक्षा ते जर व्यवहारात आले तर उत्तम, असा विचार अनेकांनी मांडला आहे. त्यातूनच डिजिटल गोल्डची (Digital Gold) संकल्पना अस्तित्वात आली. म्हणजे फिजिकल (प्रत्यक्षातील सोनं खरेदी करण्याऐवजी तुम्ही डिजिटली सोनं खरेदी करू शकता - अगदी दोन पाच रुपयांपासूनसुद्धा - आणि इलेक्ट्राॅनिक पावतीच्या आधारे पाहिजे तेव्हा त्याचे रुपांतर प्रत्यक्षातील सोन्यामध्ये करू शकता.
मग जर ही सोय डिजिटल गोल्ड देत असेल तर गोल्ड एक्सचेंज कशासाठी? (Gold exchange) तर, डिजिटल गोल्ड तुम्ही फक्त विकत घेऊ शकता परंतु अन्य अनोळखी व्यक्तींशी तुम्ही त्याचा व्यवहार करू शकत नाही. आणि असे व्यवहार पारदर्शक व विश्वासार्ह पद्धतीने होण्यासाठी सेबी मान्यताप्राप्त अशी गोल्ड एक्सचेंजसारखी संस्थात्मक रचना आवश्यक आहे. जेणेकरून सामान्य गुंतवणूकदार वा खरेदीदाराच्या हिताचे संरक्षण होऊ शकते.
सोन्याची 'खरी' किंमत काय?
गोल्ड एक्सचेंजचा (Gold Exchange) आणखी एक फायदा म्हणजे सोन्याची 'खरी' किंमत समजू शकेल. असा विचार करा की एखादी वस्तू विकत घेण्यासाठी वा विकण्यासाठी जेव्हा मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येतात तेव्हा त्याची खरी किंमत समजते. सोन्याच्या किमतींबाबतही तसेच होऊ शकते. आंतरराष्ट्रीय पातळीवर अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात आणि व्यापक स्वरुपात होणारे व्यवहार सोन्याची किंमत ठरवतील आणि अगदी त्याप्रमाणेच त्याची रास्त किंमत राष्ट्रीय वा स्थानिक पातळीवरही निश्चित होईल. किमान तसं होणं अपेक्षित आहे.
गोल्ड एक्सचेंज नेमके कसे काम करेल?
1. डिपाॅझिटरने त्यांच्याकडील सोने वाॅल्टमध्ये (अतिसुरक्षित अशा लाॅकरमध्ये) जमा करतील. त्या बदल्यात, त्यांना लाॅकर व्यवस्थापकाकडून इलेक्ट्राॅनिक गोल्ड रिसिट (ईजीआर) (electronic gold receipts) दिली जाईल.
2. ईजीआरला एक विशिष्ट संकेतांक (युनिक कोड) दिला जाईल. या ईजीआरच्या माध्यमातून गोल्ड एक्सचेंजमध्ये व्यवहार होतील. सुरवातीच्या टप्प्यात एक किलो, शंभर ग्रॅम आणि ५० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या ईजीआरद्वारे हे व्यवहार व्हावेत असा विचार सेबीने मांडला आहे.
3. व्यवहारांती, तुमची इच्छा असल्यास तुमच्याकडे असलेल्या ईजीआर सरेंडर करून त्याच्या मोबदल्यात त्या मूल्याचे प्रत्यक्षातील सोने तुम्हाला परत मिळू शकते. प्रत्यक्षात सोने मिळण्याची सोय सर्व शहरांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
4. या सर्व प्रक्रियेमध्ये वाॅल्ट व्यवस्थापकाची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे. वाॅल्टमधील सोन्याच्या मूल्याप्रमाणेच ईजीआरचे वितरण होईल याची खातरजमा या व्यवस्थापकांनी करावयाची आहे. त्यासाठी, जमा झालेल्या सोन्याशी संबंधित सर्व माहिती डिजिटल स्वरुपात आणि अत्यंत सुरक्षित अशा नेटवर्कवर उपलब्ध करून द्यावी लागेल.
5. असे म्हटले जात आहे की सोन्याचे स्टोअरेज आणि डिलिव्हरी चार्जेस हे खातेधारकाकडून वसूल करण्यात येतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.