Free Ration : गरीब कल्याण योजनेत मोठा बदल; आता मिळणार नाही मोफत धान्य

2020 पासून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) अंतर्गत मोफत रेशन वितरित केले जात होते.
Free Ration
Free RationSakal
Updated on

केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत 2023 मध्ये मोफत अन्नधान्य वाटपाची घोषणा केली आहे. 2020 पासून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) अंतर्गत मोफत रेशन वितरित केले जात होते. कोरोना काळात 81.3 कोटी लोकांना ही सेवा मोफत मिळत आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अशा लोकांनाही मोफत रेशन मिळत होते. पण, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत आता फक्त गरीब शिधापत्रिका धारकांनाच गहू आणि तांदूळ मोफत मिळणार आहे.

सरकारने एप्रिल 2020 मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू केली. कोरोना संक्रमण आणि लॉकडाऊन लागू झाल्यानंतर ही योजना सुरू करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून ही योजना संपुष्टात येणार असल्याची चर्चा होती.

मात्र मंत्रिमंडळाने ती सध्या सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आता ही योजना अन्न सुरक्षा योजनेत विलीन करण्यात आली आहे. या अंतर्गत मोफत रेशन देण्यासाठी सुमारे दोन लाख कोटी रुपये खर्च होतील. याचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. यामध्ये राज्यांकडून पैसे वसूल केले जाणार नाहीत.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

विशेष म्हणजे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गहू, तांदूळ आणि भरड धान्य 1 ते 3 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे. परंतु, केंद्र सरकारने डिसेंबर 2023 पर्यंत ही रक्कम ग्राहकांकडून वसूल केली जाणार नसल्याचे म्हटले आहे.

गेल्या 3 वर्षात या योजनेचे 7 टप्पे पूर्ण झाले आहेत. सर्वप्रथम, मार्च 2020 मध्ये, पहिल्या टप्प्यात एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी त्याची अंमलबजावणी करण्यात आली.

Free Ration
Pulses Price Hike: सर्वसामान्यांना महागाईचा झटका! डाळींच्या दरात वाढ; जाणून घ्या नवीन दर

देशात अन्नधान्याचा किती साठा आहे?

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) आणि इतर कल्याणकारी योजनांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत अतिरिक्त वाटप करण्यासाठी केंद्र सरकारकडे अन्नधान्याचा पुरेसा साठा असल्याचे मोदी सरकारने म्हटले आहे. 1 जानेवारी 2023 रोजी सुमारे 159 लाख मेट्रिक टन गहू आणि 104 एलएमटी तांदूळ उपलब्ध होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()