म्युच्युअल फंडातील गुंतवणूक नियमात 1 एप्रिलपासून बदल
तुम्ही स्टॉक ब्रोकर किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे गुंतवणूक (Investment) करत आहात का ? तर आता 1 एप्रिलपासून तुमचे पैसे तुमच्या फंड हाऊसपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो. तसेच, जर एक महत्त्वाची गोष्ट केली नाही तर एसआयपीमधील तुमची गुंतवणूक देखील थांबू शकते. सेबीने (SEBI) ऑक्टोबर 2021 मध्ये एक परिपत्रक जारी करून नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा केली होती.
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक नियमात 1 एप्रिलपासून बदल
म्युच्युअल फंड (Mutual Funds) वितरक, ऑनलाइन प्लॅटफॉर्म, स्टॉकहोल्डर किंवा गुंतवणूक सल्लागार गुंतवणूकदारांचे पैसे एका बँक खात्यात जमा करणार नाहीत. असे सेबीने (SEBI) म्यूचुअल फंड (mutual fund) हाउसेस ना सांगितले आहे. काही वितरक, ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स गुंतवणूकदारांचे पैसे आधी त्यांच्या खात्यात जमा करतात आणि नंतर त्या गुंतवणूकदारांसाठी युनिट्स खरेदी करण्यासाठी फंड हाऊसकडे पाठवतात. या बदलामुळे पैशाचा गैरवापर टाळता येईल. सेबीने म्युच्युअल फंड उद्योगाला 1 एप्रिल 2022 पासून हा बदल लागू करण्यास सांगितले आहे. यामुळे म्युच्युअल फंडाच्या कामकाजात मोठा बदल होईल. मात्र, गुंतवणूकदारांना सुरुवातीला काही अडचणी येऊ शकतात.
तुमच्या एसआयपीवरही परिणाम होईल का?
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (SIPs) द्वारे गुंतवणूक करू पाहणाऱ्या गुंतवणूकदारांवरही या बदलाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
बहुतेक SIP गुंतवणूक या गुंतवणूकदारांनी एक-वेळच्या मेंडेटवर सही करून केल्या जातात. जरी बहुतेक आदेश वितरकांच्या (Distributors) नावावर असले तरी, फंड हाऊसने पेमेंट एग्रीगेटर्स आणि वितरकांशी करार केला आहे जेणेकरून अशा आदेशांद्वारे गोळा केलेले पैसे थेट फंड हाऊसकडे जातील. आधी पैसे मध्यस्थांच्या बँक खात्यात गेले आणि नंतर मध्यस्थ ते फंड हाउसच्या बँक खात्यात हस्तांतरित करतील.
कोणत्या एसआयपीवर होईल परिणाम ?
स्टॉक ब्रोकर्स त्यांच्या खात्यात असलेल्या गुंतवणूकदारांच्या निधीद्वारे SIP सुविधा देत आहेत अशा सगळ्या एसआयपी बंद होतील असे एका आघाडीच्या फंड हाऊसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. नव्या बदलांमध्ये पूल अकाउंट्सना स्थान नसल्याचेही ते म्हणाले.
याचा अर्थ असा की तुमचा ब्रोकर लवकरच तुम्हाला एसआयपी आदेशासाठी पुन्हा नोंदणी करण्यास सांगेल, ज्यामध्ये तुम्ही फंड हाऊस किंवा स्टॉक एक्सचेंजच्या क्लिअरिंग कॉर्पोरेशनला तुमच्या बँक खात्यातून पैसे काढण्यास सांगता आणि नंतर ते थेट म्युच्युअल फंडाच्या बँकेत ट्रान्सफर करण्याचा अधिकार देतात.
नव्या SIP मेंडेटमध्ये फंड हाउस किंवा एक्सचेंजच्या क्लिअरिंग कॉर्पोरेशनच्या नावाने सही केली जाईल.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.