25 व्या वर्षापासून SIP मध्ये गुतंवणूक करुन लाखो-करोडो कमावता येतील!

लाँग टर्मसाठी एसआयपी ठेवल्याने चक्रवाढीचे फायदे मिळतात.
SIP Investment Tips
SIP Investment TipsSakal
Updated on
Summary

लाँग टर्मसाठी एसआयपी ठेवल्याने चक्रवाढीचे फायदे मिळतात.

तुम्ही अगदी छोटी बचत दर महिन्याला गुंतवण्याची सवय लावली तर भविष्यात तुम्ही लाखो कोटींचा निधी सहज तयार करू शकता. म्युच्युअल फंड (Mutual Funds) हा एक पर्याय आहे जिथे तुम्ही थेट मार्केट एक्सपोजर न घेता इक्विटी सारखा परतावा मिळवू शकता. तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (SIP) म्युच्युअल फंडामध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवू शकता. लाँग टर्मसाठी एसआयपी ठेवल्याने चक्रवाढीचे फायदे मिळतात. तुमचे वय 25 वर्ष असल्यास आणि तुम्ही 5,000 रुपयांची मासिक SIP सुरू केली असेल, तर पुढील 5, किंवा 15 वर्षांत तुम्ही किती निधी तयार करू शकता ते जाणून घ्या. (SIP Investment Tips)

SIP Investment Tips
महिन्याला 10 हजार गुंतवून 7 वर्षांत झाले 14.55 लाख, कोणती आहे ही SIP?

लाँग टर्मसाठी सरासरी वार्षिक 12 टक्के परतावा

म्युच्युअल फंड एसआयपी ही गुंतवणुकीची पद्धतशीर पद्धत आहे. बर्‍याच फंडांचा लाँग टर्म रिटर्न वार्षिक 12टक्के किंवा त्याहून अधिक असतो. यामध्ये गुंतवणूकदारांना थेट बाजाराच्या जोखमीला सामोरे जावे लागत नाही. त्याच वेळी, परतावाही उत्तम मिळतो.

SIP कॅल्क्युलेटर : 5,000 मासिक गुंतवणुकीचे 5 वर्षात किती होतील ?

समजा तुमचे वय 25 वर्ष आहे आणि तुम्ही 5,000 रुपयांची मासिक एसआयपी सुरू केली आहे. SIP कॅल्क्युलेटरनुसार, वयाच्या 30 व्या वर्षी, तुमच्याकडे सरासरी 12 टक्के रिटर्नसह 4.1 लाख रुपये असू शकतात. यामध्ये तुमची 5 वर्षातील एकूण गुंतवणूक 3 लाख रुपये आणि रिटर्न अर्थात परतावा 1.1 लाख रुपये होईल. आम्ही किमान सरासरी वार्षिक परतावा याबद्दल बोलत आहोत. अनेक फंडांचे एसआयपी रिटर्न 5 वर्षांच्या कालावधीत 40 टक्क्यांपर्यंत आहे. SIP ची खासियत म्हणजे तुम्ही फक्त 100 रुपये प्रति महिना गुंतवणुकीला सुरुवात करू शकता.

SIP Investment Tips
अरे वा! लाँच झाली 100 रुपयांची SIP, मिळेल गुंतवणुकीची उत्तम संधी

15 वर्षात किती होतील?

जर तुम्ही 15 वर्षे एसआयपी कायम ठेवली, तर वयाच्या 40 व्या वर्षी तुम्ही वार्षिक सरासरी 12 टक्के परतावा देऊन 25.2 लाख रुपयांचा निधी तयार करू शकता. यामध्ये तुमची गुंतवणूक 9 लाख रुपये असेल आणि अंदाजे संपत्ती 16.2 लाख रुपये असेल. बरं हा 12 टक्के परतावा आम्ही सरासरी सांगत आहोत, हाच परतावा कधीकधी 40 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो, त्यामुळे अगदी 15 वर्षांत तुम्ही मोठी रक्कम सहज तयार करु शकता.

म्युच्युअल फंडात मजबूत गुंतवणूक

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने (Amfi) नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, इक्विटी म्युच्युअल फंडांनी फेब्रुवारी 2022 मध्ये 19,705 कोटी रुपयांचा नेट इनफ्लो पाहिला. यापूर्वी जानेवारीमध्ये इक्विटी फंडांमध्ये 14,888 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक आली होती. मार्च 2021 पासून इक्विटी योजनांमध्ये सतत गुंतवणूक होत आहे आणि या कालावधीत या विभागात 1 लाख कोटींहून अधिक इनफ्लो दिसून आला आहे.

SIP Investment Tips
SIP म्हणजे काय? का करावी गुंतवणूक? काय आहेत फायदे?

जियोपॉलिटिकल तणावामुळे जागतिक शेअर मार्केट अस्थिर आहे. FPIs कडून वारंवार आउटफ्लो होत असूनही, देशांतर्गत गुंतवणूकदारांचा विश्वास देशांतर्गत बाजारांमध्ये मजबूत आहे. यामध्ये, सर्वात सकारात्मक प्रवाह मजबूत SIP द्वारे आला आहे. एसआयपीचा इन्फ्लो 11,000 कोटी रुपये मासिक आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.