Gautam Adani Net Worth : अदानी नऊ दिवसांत निम्म्यावर; बसला 9.5 लाख कोटींचा झटका

gautam adani hindenburg report
gautam adani hindenburg reportSakal
Updated on

काही काळापूर्वी गौतम अदानी जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक होते. अदानी यांचा जगातील टॉप 5 श्रीमंतामध्ये समावेश होता. एकेकाळी वाटत होते की आज ना उद्या तो जेफ बेझोसला मागे टाकेल.

पण आधी हिंडेनबर्ग आणि नंतर जगातील सर्वात मोठ्या एजन्सीपैकी एक असलेल्या क्रेडिट सुईसच्या रिपोर्टने अदानींच्या साम्राज्याला हादरे दिले. हे हादरे इतके मोठे होते की नऊ दिवसांत अदानी समूहाचे मार्केट कॅप निम्म्यावर आले आहे. अदानी समूहाच्या शेअर्सची घसरण सुरूच आहे. कंपनी आपली प्रतिष्ठा सावरण्यासाठी धडपडत आहे पण त्यांना यश मिळताना दिसत नाहीये.

अमेरिकेतील 'शॉर्ट सेलर' फर्म हिंडेनबर्ग रिसर्चच्या रिपोर्टमध्ये अदानी समूहावर फसवणूक आणि शेअरच्या किमतीत फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला होता. तेव्हापासून समूहतील कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण सुरू झाली.

मात्र, अदानी समूहाने हे आरोप खोटे ठरवत हिंडेनबर्गवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले. पण त्याच्या या धमकीचा या घसरणीवर काहीही परिणाम झाला नाही.

gautam adani hindenburg report
Kasba Peth By-Election : 'आता नंबर बापटांचा का…?'; कसब्यात भाजपच्या उमेदवारीवरून झळकले पोस्टर

स्टॉक्सबॉक्सचे संशोधन प्रमुख मनीष चौधरी म्हणाले की, गेल्या नऊ दिवसांत सर्व समूह कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल 9.5 लाख कोटी रुपये किंवा सुमारे 49 टक्क्यांनी घसरले आहे. ते म्हणाले की, एफपीओ काढणे चुकीचे सिद्ध झाले आहे. अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप नऊ दिवसांत 9.5 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे.

gautam adani hindenburg report
Turkey Earthquake : तुर्की-सीरियात भूकंपामुळे हाहाकार; 3400 हून अधिक मृत्यू; भारतातून NDRF टीम रवाना

आठवड्याच्या पहिल्या दिवशी व्यवहार बंद असताना अदानी समूहाच्या दहापैकी सहा कंपन्यांचे शेअर्स तोट्यात राहिले. अदानी ट्रान्समिशन शेअर्स 10 टक्क्यांनी घसरले, तर अदानी टोटल गॅस, अदानी पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी विल्मार प्रत्येकी पाच टक्क्यांनी घसरले.

समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 0.74 टक्क्यांनी घसरून बंद झाले. त्याचा स्टॉक सुरुवातीच्या व्यापारात 9.50 टक्क्यांनी घसरला पण नंतर तो सावरला. दुसरीकडे, घसरणीचा कल असतानाही समूहातील चार कंपन्यांनी नफा नोंदविला. यापैकी अदानी पोर्ट्स आणि सेझ लिमिटेड 9.46 टक्क्यांनी वाढण्यात यशस्वी ठरले. अंबुजा सिमेंटमध्ये 1.54 टक्के, एसीसी 2.24 टक्के आणि एनडीटीव्ही 1.37 टक्क्यांनी सुधारणा झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.