Gautam Adani News : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी आता देशातील प्रत्येक घरात पाणी पोहोचवणार आहेत. देशाच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात प्रचंड प्रभाव असलेला त्यांचा अदानी समूह आधीच प्रत्येक घरात वीज आणि स्वयंपाकाचा गॅस पुरवतो.
त्याच वेळी, बंदर, विमानतळ, रस्ता, सिमेंट आणि एक्स्प्रेस वे यांसारख्या सर्व मुख्य व्यवसायांमध्ये त्यांची उपस्थिती आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, अदानी एंटरप्रायझेस आता जलशुद्धीकरणापासून त्याच्या वितरण विभागात प्रवेश करणार आहे. पायाभूत सुविधा क्षेत्राच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
अदानी समुहाचे मुख्य वित्तीय अधिकारी जुगशिंदर सिंग यांनी माध्यमांना सांगितले की, कंपनीचा वॉटर सेगमेंटमधील प्रवेश कंपनीसाठी महत्त्वाचा आहे. ते म्हणाले की, अदानी समूह ही देशातील पायाभूत सुविधा क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. आम्ही गेल्या 20 वर्षांपासून या क्षेत्रात काम करत आहोत. त्यामुळे आम्ही जलशुद्धीकरण, शुद्धीकरण आणि वितरण क्षेत्रात प्रवेश करण्यास उत्सुक आहोत.
कंपनी या क्षेत्रातील शक्यता आणि संधींचे मूल्यांकन करत असल्याचे म्हटले असले तरी कंपनी या विभागातील संयुक्त उपक्रम प्रकल्प आणि अधिग्रहणांवर देखील लक्ष देत आहे.
हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय
20,000 कोटींचा FPO येत आहे :
पुढील आठवड्यात अदानी एंटरप्रायझेस फॉलो ऑन पब्लिक ऑफर (FPO) घेऊन येत आहे. या माध्यमातून 20,000 कोटी रुपये उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. या FPO साठी किंमत बँड 3,112 रुपये ते 3,276 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आला आहे.
2015 मध्ये कोल इंडियाच्या 22,558 कोटी रुपयांच्या FPTO नंतर देशातील हा दुसरा सर्वात मोठा FPO आहे. कोल इंडियाचा 15,199 कोटी रुपयांचा IPO (Intial Public Offer) ऑक्टोबर 2010 मध्ये आला होता.
कंपनीचा FPO 27 जानेवारीला उघडेल आणि 31 जानेवारीला बंद होईल. तो अँकरसाठी म्हणजे मोठ्या गुंतवणूकदारांसाठी एक दिवस आधी उघडेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.