तुमच्या आधार कार्ड क्रमांकावर किती जणांनी घेतलंय सिमकार्ड?

Sim-Connection
Sim-Connection
Updated on

आधार कार्ड हे आपल्या सर्वांसाठीच महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. त्याशिवाय आपली सरकारी किंवा प्रशासकीय कामं खोळंबतात. ठिकठिकाणी ओळखपत्र म्हणून आधार कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.

पण एका आधार कार्डवरून 18 फोन कनेक्शन मिळवू शकता, याची तुम्हाला माहिती आहे का? अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या आधार क्रमांकावरून दुसऱ्या कोणीतरी फोन कनेक्शन घेतलं आहे का, हे चेक करायचं असेल, तर ते शोधणं खूप सोपं आहे. याविषयी तुम्ही घरी बसून सहजपणे माहिती मिळवू शकता.

अनेकदा आपल्या आधार डिटेल्सवर अन्य काहीजण सिमकार्ड इश्यू करू शकतात. तसेच खोट्या डिटेल्सचा वापर करून मिळवलेल्या सिमकार्डमार्फत तुमची फसवणूकही होऊ शकते. यामुळे एकाच आधार कार्डच्या क्रमांकावरून अन्य कोणते सिमकार्ड घेण्यात आले आहेत का, याची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे.

पूर्वी तुम्ही एका बेसवरून 9 सिम खरेदी करू शकत होता. पण आता तुम्ही 18 सिम खरेदी करू शकता. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने केलेल्या बदलांनंतर तुम्ही 18 क्रमांक खरेदी करू शकता. अनेकांना व्यवसायासाठी एकाहून अधिक सिमकार्डची गरज असते. त्यामुळे ही मर्यादा वाढवण्यात आली आहे. आधार कार्डाशी किती क्रमांक जोडलेले आहेत हे जाणून घेण्यासाठी, आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डाशी जोडलेला असावा. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे कनेक्शन शोधणं सोपं जातं.

जाणून घ्या प्रक्रिया...

1.तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

2.होम पेजवर, Get Aadhaar वर क्लिक करा.

3.आता डाउनलोड आधार वर क्लिक करा.

4.येथे View More पर्यायावर क्लिक करा.

5.आता तुम्हाला इथे किती रेकॉर्ड पाहायचे आहेत ते टाका. आता इथे OTP एंटर करा आणि Verify OTP वर क्लिक करा.

6.एक नवीन इंटरफेस तुमच्या समोर उघडेल.

7. आता तुम्ही तुमचे तपशील मिळवू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()