आता ग्रुप हेल्थ इन्शुरन्स घेणे सोपे होणार आहे.
आता ग्रुप हेल्थ इन्शुरन्स (Group Health Insurance) घेणे सोपे होणार आहे. यासाठी तुम्हाला एखाद्या कंपनीचे कर्मचारी असण्याची गरज नाही. आता ग्रुप किंवा सोसायटी तयार करून विमा घेता येतो. त्यासाठी 'आयआरडीए'ने प्रारूप प्रस्ताव जारी केला आहे. ज्याअंतर्गत ग्रुप हेल्थ इन्शुरन्समध्ये मोठे बदल होणार आहेत. कोरोनानंतर मोठ्या धोरणात बदल करण्याची तयारी आहे. आयआरडीएआयने बदलाचा मसुदा (Draft) जारी केला आहे.
या मसुद्यातील प्रस्तावांनुसार ग्रुप हेल्थ इन्शुरन्ससाठी एखाद्या कंपनीचा कर्मचारी असण्याची गरज भासणार नाही. आता ग्रुप बनवून ग्रुप हेल्थ इन्शुरन्स मिळवता येणार आहे. यामुळे विमा पोर्टिंगही सोपे होईल. त्याचबरोबर नेटवर्क हॉस्पिटलमधील ग्राहकांना कॅशलेस निर्णय देण्याची संपूर्ण जबाबदारी विमा कंपन्यांची असेल. या संदर्भात आयआरडीएआय सध्याच्या आरोग्य आणि तृतीय पक्षाच्या नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याची तयारी करत आहे.
मसुद्यातील प्रस्तावांनुसार कॅशलेस सुविधेची जबाबदारी विमा कंपनीची असेल. सध्या ज्या Bipartite/Tripartite Agreements वर काही त्रुटी आहेत. विमा पोर्टिंगवर नॉन-डिस्क्लोजर कलम देखील नाही. आता 5 दिवसांत क्लेम हिस्ट्री देण्याची जबाबदारी नवीन कंपनीवर असणार आहे. थर्ड पार्टी रेग्युलेशनमध्ये कंपनीला अटींमध्ये शिथिलता मिळणार आहे. बोर्डात आता एमबीबीएससह AYUSH डॉक्टरही असतील. कंपन्या अनुभवाच्या आधारे सीईओंची नियुक्ती करतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.