Gold Rate : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सातत्यानं कपात होत आहे. उच्चांकीवाढीपासून आतापर्यंत सोन्याच्या दरांत प्रति तोळा तब्बल २० टक्क्यांची म्हणजेच जवळपास १२ हजार रुपयांची कपात पाहायला मिळाली. पुढील काही दिवस सोन्याच्या किंमतीमध्ये आणखी कपात होऊ शकते, असा अंदाज काही तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करत असाल तर आणखी काही दिवस थांबण्याचा सल्ला काही तज्ज्ञ देत आहेत. सध्या सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची योग्य संधी आहे. मात्र, आणखी काही दिवस वाट पाहिल्यास सोन्याची किंमत प्रति तोळा ४० हजार रुपयांच्या खाली येऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
गोल्ड बॉन्डमधील गुंतवणुकीचं वाढतं प्रमाण आणि कमकुवत होणाऱ्या डॉलरचा परिणाम थेट सोन्याच्या किंमतीवर होत आहे. वाढत्या महागाईच्या काळात अनेकजण सुरक्षित आणि दिर्घकालीन गुंतवणूक म्हणून सोन्याऐवजी गोल्ड बॉन्डला पसंती दर्शवत आहेत. पण पुढील काही दिवसांमध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
किती रुपयांपर्यंत घसरु शकते किंमत ?
सध्या सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. बुधवारी सोन्याचा दर प्रति तोळा ४४ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहचला होता. ऑगस्ट २०२० मध्ये सोनं प्रति तोळा ५६ हजार रुपयांपर्यंत पोहचलं होतं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये झपाट्यानं घट होत आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, सोन्याची किंमत प्रति तोळा ४० हजार रुपयांच्या खाली येऊ शकते. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आणखी काही दिवस वाट पाहा. सध्याच्या घडीलाही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे.
याआधी ४० हजारांच्या खाली कधी होतं?
ऑक्टोबर २०१९ मध्ये सोनं प्रति तोळा ४० हजार रुपयांच्या खाली होतं. तेव्हापासून अमेरिका आणि चीन यांच्यामधील व्यापार युद्ध आणि नंतर कोरोना आलेलं कोरोना महामारीचं संकट, यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये सातत्यानं वाढ पाहायला मिळाली. काही गुंतवणूकदारांनी सोन्याऐवजी बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यास पसंती दर्शवत आहे.
सध्याच्या गुंतवणूकीचं काय?
सध्या कोणताही तज्ज्ञ सोनं विकण्याचा सल्ला देत नाही. काही विश्लेषकांच्या मते, मर्यादीत कालावधीसाठी सोन्यामध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतणूक करण्याची मोठी संधी आहे. पुढील सात ते आठ महिन्यानंतर सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होऊ शकते. पुढील महिनाभरात सोन्याची किंमत ४८ हजारांच्या पुढेही जाऊ शकते.
कशी कराल गुंतवणूक?
सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय आहेत. ज्यामध्ये गोल्ड म्युच्युअल फंडाचाही(gold mutual fund) समावेश आहे. गोल्ड म्युच्युअल फंडानं वर्षभरात १३ टक्के रिटर्न दिलं आहे. जे एखाद्या एफडीपेक्षा नक्कीच चांगलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.