-: शिल्पा गुजर
सोन्याच्या किंमती येत्या काळात आणखी वाढणार, विक्रमी दरावर पोहोचेल सोने, तज्ज्ञांचे मतमल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये (MCX) शनिवारी सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम सुमारे 47,300 रुपयांवर घसरली. याआधी शुक्रवारी सोने प्रति 10 ग्रॅम 48,000 रुपयांवर होते. सध्या प्रॉफिट बुकींगमुळे सोन्याच्या दरात घट होत असल्याचे कमोडिटी मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली वाढ आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची कमकुवतता हे दोन गोष्टींमुळे सोन्याच्या किंमतीत वाढतच राहतील असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याला 1720 डॉलर प्रति औंसवर भक्कम सपोर्ट असल्याचे कमोडिटी मार्केटच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याचा अर्थ सोन्याचा भाव त्यापेक्षा कमी होणे खूप कठीण आहे. अल्पावधीत सोने 1800 डॉलर प्रति औंसपर्यंत जाईल अशी अपेक्षा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पुढच्या महिन्याचा विचार केला तर सोन्याच्या किंमती 1850 डॉलर प्रति औंसपर्यंत जाऊ शकते असे तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांनी सध्याच्या 47,300 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने सोने खरेदी करण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.
अमेरिकन फेडने अद्याप व्याजदर केव्हा वाढवणार हे सांगितलेले नसल्याचे एका तज्ज्ञाने सांगितले. आणि ही गोष्ट सोन्याच्या बाजूने जाते. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सध्याच्या घसरणीच्या पातळीवर सोने खरेदी करू शकतात. एमसीएक्सवर येत्या एका महिन्यात सोने 49,600 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.