नव्या वर्षात सोन्याच्या किमती गाठू शकतात उच्चांक

Gold Sakal.jpg
Gold Sakal.jpg
Updated on

गुतवणूकदारांसाठी सोने हा पर्याय नेहमीच सुरक्षित गुंतवणूक म्हणून राहिला आहे. कोणत्याही परिस्थिती सोने कामाला येऊ शकते आणि त्यामुळे सर्वजण सोने घरी सुरक्षित ठेवतात. जे सोन्यात गुंतवणूक करतात त्यांच्यासाठी येणारे वर्ष उत्तम ठरू शकते. कारण नवीन वर्षात सोन्याची किंमत वाढण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे. काही वित्त अभ्यासकांच्या मते नवीन वर्षात सोन्याची किमती सर्व रेकॉर्ड तोडू शकतात. येणाऱ्या वर्षात सोन्याच्या दरामध्ये तीव्र वाढ होऊ शकते, असे अनेक तज्ञ अंदाज करत आहेत. त्यांच्या मते नवीन वर्षात, सोने 63000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा आकडा ओलांडू शकतो.  

सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी पुढचे वर्ष 2021 सर्वोत्कृष्ट ठरण्याची शक्यता आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते, सन 2021 मध्ये सोन्याचे सर्व विक्रम मोडणार आहेत. तज्ञांच्या मते, नवीन वर्ष 2021 मध्ये सोने नवीन उंची गाठू शकेल. सध्या सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 50000 रुपयांच्या जवळपास आहेत. व यामुळे नवीन वर्षापर्यंत प्रति 10 ग्रॅम 15000 रुपये वाढ शकेल. 

नवीन वर्षात कोरोनाच्या संकटामुळे सरकार आणखी एक मदत पॅकेज जाहीर करण्याची अपेक्षा आहे. तर आंतरराष्ट्रीय चलन म्हणून वापरण्यात येणारा डॉलर कमकुवत झाल्यामुळे सोन्याला मजबुती मिळण्याची शक्यता आहे. तसेच कोरोना संकटादरम्यान, गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची निवड केल्याचे दिसून आले आहे. व त्यामुळे सोन्याच्या किंमतीत तेजीने वाढ झाली आहे. जी पुढे चालू राहील अशी अपेक्षा जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यावर्षी सोन्याने 56263 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती. 2020 च्या सुरवातीला सोन्याची किंमत 39100 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. 

जर सरकारने आणखी एक मदत पॅकेज जाहीर केले तर, डॉलर कमकुवत होईल. ज्यामुळे सोन्याच्या किंमतींमध्ये आणखी वाढहोण्याची शक्यता आहे. त्याच वेळी सुरक्षित गुंतवणूक म्हणून देखील सोन्यात होणारी गुंतवणूक वाढू शकते. काही जाणकारांच्या मते तिसऱ्या तिमाहीत सोन्याची मागणी 30 टक्के घसरल्यानंतर आगामी चौथ्या तिमाहीत मागणी वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय एका अहवालानुसार मध्यवर्ती बँकांचा कल, कमी व्याज दर यासह कोरोना साथीच्या परिणामाचा प्रभाव सोन्याच्या दरावर होत असल्याचे समजते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.