औरंगाबाद: Gold silver prices- सोने चांदीच्या दरात मागील काही दिवसांपासून नेहमी चढ-उतार दिसत आहे. शेअर मार्केटमधील बबलचा परिणाम, कोरोना महामारी आणि अमेरिकेतील सत्ताबदलानंतर तिथल्या आर्थिक धोरणांचा परिणाम जागतिक बाजारावर होत आहे. यामुळेच जागतिक बाजारपेठेसह भारतातही मौल्यवान धातुंच्या किमतीत बदल दिसत आहे. आज (22 मार्च) सोने किंमतीत (Gold prices) वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक घसरणीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सलग दुसर्या दिवशी सोन्याचा भाव वाढला. गुंतवणुकादारांनी डॉलरच्या तुलनेत मौल्यवान सोन्यामध्ये गुंतवणूक करणे पसंद केले आहे.
Multi Commodity Exchange नुसार, सोन्याचे भाव 97 रुपयांनी म्हणजे 0.21 टक्क्यांनी वाढून 47 हजार 171 प्रति तोळा झाले आहेत. तर सोमवारी बाजार बंद होताना हे भाव 47 हजार 171 वर स्थिर झाले होते. तर चांदीच्या भावात मोठा बदल दिसला नाही. तर आजचा चांदीचा भाव 67 हजार 722 रुपये प्रति किलो असा होता. मागील आठवड्यात एमसीएक्सवर सोन्याचे भाव 4.3 टक्क्यांनी पडले होते. तर COMEX वर ही घट 5.5 टक्क्यांची होती.
जागतिक बाजारपेठेत सोन्याचे भाव 0.1 टक्क्यांनी वाढून 1,784.83 डॉलर प्रति औंस विकले जात आहे. तर अमेरिकेतही हे भाव 0.1 टक्क्यांनी वाढून 1,783.90 प्रति औंसला बाजार करत आहेत. रॉयटर्सच्या मते, डॉलर निर्देशांक दोन महिन्यांच्या उच्चांकानंतर कमी झाला आहे.
मागील वर्षी सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ दिसून आली होती. 2020 च्या ऑगस्ट महिन्यात सोन्याचे भाव आता पर्यंतच्या विक्रमी 56 हजार 200 रुपयांपर्यंत गेले होते. तसेच चांदीच्या किंमतीनीही नवा विक्रम केला होता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.