सोनं गाठणार प्रति तोळा एक लाखांचा टप्पा; कधी ते जाणून घ्या?

today gold prices
today gold pricese sakal
Updated on

तुमच्या आमच्या सारखे सर्व सर्वसामान्य नागरिक, आपण कायम एक सेफ गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहत असतो. तोळा तोळा करून आपण भविष्याची तरतूद सोनं घेऊन कायम करत असतो. भारतीयांना कायम सोन्याचे भाव वाढलेत, की कमी झालेत हे जाणून घेण्यास आवडतं. कारण त्यांची भावनिक नाळ सोन्याशी जोडली गेलेली असते. याच सोन्याचे भाव येत्या काळात सध्याच्या बाजारभावापेक्षा दुप्पट म्हणजेच लाखांच्या घरात देखील जाऊ शकतात. हे आम्ही नाही तर सोन्याच्या दरांबाबत आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक तसेच वित्तीय धोरणांबाबत माहिती असणाऱ्या डिएगो पॅरिला यांचं म्हणणं आहे.

सोन्याच्या किंमती येत्या काळात नवीन उच्चांकावर पोहोचू शकतात. थोड्या फार नव्हे तर येत्या काळात सोनं सध्याच्या किमतीपेक्षा तब्बल दुप्पट होण्याची शक्यता वर्तवली जातेय. याला कारण म्हणजे कोरोनानंतर गुंतवणूकदारांना अनेक देशांमध्ये दिली जाणारी मदत आणि पॅकेजेस. या पॅकेजेसमुळे मध्यवर्ती बँकांना भविष्यात येणाऱ्या अडचणींची फारशी जाणीव नसते. 250 मिलियन डॉलर्सचा (Quadriga Igneo fund )क्वाड्रिगा इग्निओ फंड हाताळणारे डिएगो पॅरिला, यांच्या मते पुढील तीन ते पाच वर्षांत सोने 3,000 ते 5,000 डॉलर प्रति औंस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आधी 2016 मध्ये डिएगो पॅरिला यांनी पुढील पाच वर्षात सोनं नवीन उच्चांकावर जाऊ शकतं याबाबत भाकीत केलं होतं.

today gold prices
HSC Result 2021 : बारावीचा निकाल आज, कसा अन् कुठे पाहाल?

एक औंस म्हणजे 28.3495 ग्राम

सोनं 5 हजार प्रति औंस गेलं तर 74 रुपये प्रति डॉलर भावानुसार 3 तोळे सोन्याची किंमत 3 लाख 70 हजारांच्या घरात जाते.

म्हणजेच एक तोळा सोन्याची किंमत तब्बल 1 लाख 23 हजाराच्या वर

डिएगो पॅरिला यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, खराब आर्थिक आणि वित्तीय धोरणांमुळे होणाऱ्या दीर्घकालीन नुकसानीबाबत फारशी जागरूकता नाही. ते पुढे म्हणालेत की, काही कारणांसाठी जाणीवपूर्वक व्याजदर कमी ठेवले जातात ज्यामुळे आर्थिक व्यवस्थेत फुगवटे तयार व्हायला सुरवात होते. हे फुगवटे नंतर पूर्वपदावर येणं कठीण असतं. यामुळे मध्यवर्ती बँकांना पुन्हा सामान्य स्थितीत येणे कठीण होईल. डिएगो यांच्या मतानुसार सोन्यामध्ये येणाऱ्या तेजीची अनेक कारणे आहेत आणि कारणे मजबूत असल्याचं ते म्हणतात.

today gold prices
२२ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल; पाहा नवे नियम

वर्ष 2020 मध्ये कोरोना महामारीच्या कारणामुळे जगभरात मोठं नुकसान झालं. तेंव्हा सोन्याच्या किमती या 2,075.47 डॉलर प्रति औंस इतक्या उच्चांकावर गेलेल्या पाहायला मिळाल्यात. मात्र गेल्या काही आठवड्यांमध्ये सध्या सोनं आंतराष्ट्रीय बाजारात 1,800 डॉलर प्रति औंस च्या आसपास असल्याचं पाहायला मिळतंय. अमेरिकेत फेडरल रिजर्व पॉलिसीला अधिक कठोर करण्याच्या संकेतांनंतर सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. डिएगो यांच्या मतानुसार नागरिकांना वाटतं तेवढं सेंट्रल बँकांचं सध्याच्या परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण असल्याचे ते म्हणतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()