सोने स्वतःत खरेदीची आताच संधी; भाव ५५ हजारांवर जाणार

दोन वर्षांपूर्वी टाळेबंदी लागल्यानंतर सोन्याचे दर ३८ हजार प्रति ग्रॅमवरून ५७ हजारांवर गेले होते
gold
goldgold
Updated on

नागपूर : शहरात आणि जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉनच्या (Omicron) रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यात ओमिक्रॉनची धास्ती वाढलेली आहे. रुग्णांचा आकडा असाच वाढत राहिला आणि संसर्ग वाढला तर सोन्याचा भाव (Gold Rate) प्रति दहा ग्रॅम ५५ हजारांच्या (The price will go up to Rs 55,000) जवळपास जाण्याचा अंदाज सराफा व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सध्या नव्या वर्षाचे सेलिब्रेशन सुरू आहे. बहुतांश नागरिक सुट्टीनिमित्त घराबाहेर पडले आहेत. पर्यटनासह लग्नसराई आणि पर्यटनस्थळी नवीन वर्ष साजरा केला जात आहे. त्यामुळे सोन्याची मागणी कमी झालेली आहे. शिवाय सोन्याचे आंतरराष्ट्रीय बाजारही बंद आहे. सोन्याचे व्यवहार कमी झालेले आहे काही ठिकाणी बंद आहेत. त्यामुळे तुलनेने व्यापार कमी होत आहेत. व्यवहार देखील कमी होत आहेत. अशीच परिस्थिती विदर्भासह जिल्ह्यात आहे. मात्र, १४ जानेवारीपर्यंत लग्नाचे मुहूर्त आहेत. त्यासाठी अद्यापही अनेकांची खरेदी झालेली नाही. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता अनेकांनी आताच लग्नाचा बार उडविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी (Gold Rate) बाजारात गर्दी वाढण्याचे संकेत मिळत आहे.

gold
सैनिक पती ड्युटीवर जाताच पत्नीची आत्महत्या; चॅटिंगने घेतला जीव

मकरसंक्रांतीपूर्वी लग्न सोहळे वाढण्याची शक्यता आहे. तसेच लग्नात पाहुणे बोलविण्यावरही निर्बंध आणले आहे. परिणामी, खर्च कमी होणार असल्याने अनेकांनी आल्या पाल्यांना भेट देण्यासाठी सोने खरेदीचा पर्याय निवडण्याबद्दलही चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे ग्राहक सराफा व्यापाराकडे वळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकार जरी सध्या टाळेबंदीचा विचार नसल्याचे सांगत असले तरी ग्राहकांच्या मनात भीती आहे. अशा स्थितीत सोन्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती सराफा व्यापाऱ्यांनी दिली.

दोन वर्षांपूर्वी टाळेबंदी लागल्यानंतर सोन्याचे दर अचानकच सुरक्षित गुंतवणूक म्हणून ३८ हजार प्रति ग्रॅमवरून ५७ हजारांवर गेले होते. दुसऱ्या टाळेबंदीतही हाच विक्रमी दर कमी झाला होते. रुग्ण वाढल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची आवक कमी होते. दरम्यान, मागणीही वाढते. त्यामुळेच भाव वाढण्याची शक्यता असून सोने (Gold Rate) पुन्हा ५५ हजारांच्यावर जाईल.
- राजेश रोकडे, संचालक, रोकडे ज्वेलर्स
gold
UP Election : ‘एकदा संधी द्या, आम्ही शाळा आणि रुग्णालये बांधू’

मागील भाव (प्रति दहा ग्रॅम)

  • जानेवारी २०१९ - ३८,००० रुपये

  • जानेवारी २०२० - ५७,००० रुपये

  • जानेवारी २०२१ -- ५०,००० रुपये

  • जानेवारी २०२२ - ४८,७०० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.