नवी दिल्ली : भारतीय सराफा बाजारात कालच्या वाढीनंतरही सोन्याच्या दरात प्रति तोळा किंचीत वाढ झालेली दिसते. आज चांदीच्या किंमतीतही (Silver Price Today) स्थिरता पाहायला मिळाली. कालच्या (ता.5) वाढीनंतर चांदीचे दरही 59 रुपये प्रति किलोपेक्षा जास्त झाले. आज दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति तोळा (22 कॅरेट साठी ) 45,680 रुपये तर तर 24 कॅरेटसाठी 46,680 आहेत. तर चांदीचे दर 60,600 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचले. दरम्यान भारतीय बाजारांच्या उलट परिस्थिती आंतरराष्ट्रीय बाजारात (Gold Price Today in International Market) पाहायला मिळाली. याठिकाणी आज सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. तर चांदीच्या दरात विशेष बदल झालेला नाही.
आजचा भाव (ता.६)
ग्रॅम - 22 कॅरेट(आज) 22 कॅरेट (काल)
1 ग्रॅम 4568 4549
8 ग्रऐम 36,544 36,392
10 ग्रॅम 45,680 45,490
100 ग्रॅम 4 ,56,800 4,54,900
ग्रॅम - 24 कॅरेट(आज) 24 कॅरेट (काल)
1 ग्रॅम 4668 4649
8 ग्रॅम 37,344 37,192
10 ग्रॅम 46,680 46,490
100 ग्रॅम 4,66,800 4,64,900
सोन्याचे आजचे दर (Gold Rate Today on 6 October 2021)
आज बुधवारी सोन्याचा भाव प्रतितोळा २२ कॅरेटसाठी 45,680 तर २४ कॅरेटसाठी 46,680 असा भाव आहे. कालच्या तुलनेत आजच्या भावात किंचीत घट झालेली दिसते. ग्लोबल मार्केटमध्ये काल (ता.५) सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे.
चांदीचे आजचे दर (Silver Rate Today on 6 October 2021)
चांदीच्या किंमतीत देखील काल (ता.५) मोठी उसळी पाहायला मिळाली. यामुळे चांदी आज 60,600 रुपये प्रति किलोग्रॅमवर आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात विशेष बदल दिसत नाही
का वाढले सोन्याचांदीचे दर?
मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य 32 पैशांनी कमी झाले आहे. फॉरेक्स मार्केटमध्ये काल रुपया 74.63 च्या खालच्या स्तरावर उघडला होता. यामुळे भारतीय बाजारात सोन्याच्या दरात बदल पाहायला मिळाला आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.