काय सांगता! दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव गाठणार आतापर्यंतचा उच्चांक?
नागपूर ः कोरोना (Coronavirus)आणि त्यामुळे असलेल्या लॉकडानमुळे (Coronalockdown) अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद आहेत. त्यामुळे सर्वच प्रकारच्या व्यापाऱ्यांना याचा प्रचंड मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यात सोने- चांदीचे सराफा व्यापारी (Jewellers shop) दुकान बंद असल्यानं अडचणीत आहेत. मात्र आता दिवाळीपर्यंत (Diwali 2021) सोन्याचा भाव उच्चांक गाठणार अशी शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे. (gold rates will increased till diwali 2021)
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेला बाजारपेठ बंद असली तरी ग्राहकांनी ऑनलाइन सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच टाळेबंदीचे नियम शिथिल होतील. त्यानंतर सणासुदीचा काळ असल्याने सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
दिवाळीपर्यंत दहा ग्रॅम सोन्यासाठी ६५ हजार रुपये मोजावे लागू शकतात. तर चांदीचा दर प्रति किलो ८० हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सोन्याचे भाव सध्या ४९ हजारांवर तर चांदी प्रति किलो ७५ हजारांवर पोहोचली आहे. सणवार आणि लग्नसराईत लोकांचा कल सोनं खरेदीकडे राहिला आहे.
(gold rates will increased till diwali 2021)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.