Gold Price : सोन्या-चांदीच्या किंमतीत कमालीची वाढ! जाणून घ्या नवे दर

तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची
Check Today's Gold Silver Price Updates
Check Today's Gold Silver Price Updatesesakal
Updated on
Summary

भारतासह जगातील सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. यामुळे खरेदीदार खूप निराश दिसतात.

जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यात 13 दिवस चाललेल्या युद्धामुळे भारतासह जगातील सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price) कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. यामुळे खरेदीदार खूप निराश दिसतात. देशात सोन्याचांदीचा भाव पुन्हा एकदा आपल्या विक्रमी पातळीच्या दिशेने वेगाने जात आहे. इतकंच नाही तर सराफ बाजारातील तज्ज्ञांच्या मते सोन्या-चांदीचे भाव तेजीत राहू शकतात. (Today's Gold Silver Price Updates)

Check Today's Gold Silver Price Updates
ऐन लग्नसराईत सोने-चांदीचे भाव वाढले; जाणून घ्या दर

सध्या देशात सोनं जवळपास 53,600 रुपये आणि चांदी 70,600 रुपयांवर आली आहे. मात्र, या तेजीनंतरही भारतात सोने सध्या त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा सुमारे 2600 रुपये आणि चांदी 9400 रुपयांनी स्वस्त दराने विकली जात आहे. सराफ बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सोने-चांदीच्या भावात वाढ होत राहू शकते.

या व्यापारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय सराफ बाजारात सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 1811 रुपयांवर वधारून 53,595 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. याआधी शुक्रवारी सोनं 51,784 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झालं होतं. त्याच वेळी चांदीचा भाव 2649 रुपयांनी महागला आणि 70,580 रुपये प्रति किलोवर बंद झाला. याआधी शुक्रवारी चांदी 67,931 प्रति किलोच्या पातळीवर बंद झाली होती.

Check Today's Gold Silver Price Updates
Gold Price : युद्धामुळे सोने-चांदीच्या किमतीत वाढ! जाणून घ्या नवे दर

14 ते 24 कॅरेट सोन्याचा नवा भाव (Latest Rate of 24 carat Gold)

सोमवारी 24 कॅरेट सोने 1811रुपयांनी महागून 53595 रुपये, 23 कॅरेट सोने 1803 ते 53380 रुपये, 22 कॅरेट सोने 1559 ते 49093 रुपये, 18 कॅरेट सोने 1358 रुपयांनी महाग होऊन 40196 रुपये आणि 14 कॅरेट सोने 1059 रुपयांनी महागले आणि 14 कॅरेट सोने 1059 रुपयांनी महागले आणि 31353 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.

अशा प्रकारे जाणून घ्या सोन्याची शुद्धता (How to Identify Purity of Gold)

आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.

Check Today's Gold Silver Price Updates
Gold Price : सोने खरेदी करणं झालं महाग! पाहा किती आहे 10 ग्रॅमची किंमत

मिस्ड कॉल देऊन अशा प्रकारे सोन्याची नवीन किंमत (Latest price of gold) जाणून घ्या

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर (Retail rates) जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. यासह, वारंवार अपडेट्सबद्दल माहितीसाठी तुम्ही www.Ibja.Co ला भेट देऊ शकता.

हॉलमार्क (Hallmark) पाहूनच सोने खरेदी करा

सोने खरेदी करताना त्याची गुणवत्ता लक्षात ठेवा. हॉलमार्क (Hallmark) पाहूनच सोन्याचे दागिने (Gold jewelry) खरेदी करावेत. हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी आहे आणि ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) ही भारतातील एकमेव एजन्सी आहे, जी हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमांनुसार चालते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.