Gold Silver Price: सोने-चांदी महागली; मोजावे लागणार जास्त पैसे

आज सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली असून ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
Silver & Gold price Updates
Silver & Gold price UpdatesSAKAL
Updated on

Gold-Silver Price Today: सोन्याच्या किंमतीत सतत चढउतार होत असतात. आज म्हणजेच 23 मार्च रोजी देशात सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. देशात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत प्रतितोळा 47,750 झाली आहे. काल ही किंमत 47,400 होती, 22 कॅरेट सोन्याच्या दरात 10 ग्रॅममागे 350 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. युक्रेन रशिया युद्धाचे परिणाम आता भारतीय बाजारपेठेवर स्पष्टपणे दिसू लागले आहेत. त्यामुळेच सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. (Silver & Gold price Updates)

Silver & Gold price Updates
Gold-Silver Price: सोनं-चांदी झाली स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

24 कॅरेट सोन्याची किंमत-

देशात आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रतितोळा 400 रुपयांची वाढ होऊन 52,100 रुपये झाली आहे. कालच्या दिवशी ही किंमत 51,700 रुपये होती.

चांदीच्या दरातही वाढ-

चांदीच्या दराबाबत बोलायचे झाले तर आज एक किलो चांदीचा दर 68,900 आहे. त्याच वेळी, ही किंमत काल 68,300 होती. म्हणजेच चांदीच्या दरात किलोमागे 600 रुपयांची वाढ झाली आहे.

Silver & Gold price Updates
Gold-Silver Price : सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ!

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

Silver & Gold price Updates
Gold Silver Price: सोने पुन्हा महागले; जाणून घ्या आजचा भाव

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.