Gold-Silver Price: सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर

आज देशात सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
Today's Gold Silver Price Updates
Today's Gold Silver Price Updatesesakal
Updated on

Gold-Silver Price Today: सोन्याच्या दरात चढउतार होत असतात. आज 24 मार्च रोजी देशात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. देशात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,350 आहे, कालच्या दिवशी 47,750 होती. म्हणजेच 10 ग्रॅममागे 400 रुपयांची घट झाली आहे.

24 कॅरेट सोन्याची किंमत-

देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत आज 51,670 रुपये आहे. काल ही किंमत 52,100 रुपये होती. वरील सोन्याचे दर सूचक असून त्यात GST, TCS आणि इतर शुल्क समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.

Today's Gold Silver Price Updates
Gold Price Update: स्वस्तात सोनं खरेदीची हीच संधी, जाणून घ्या नवे दर

चांदीच्या दरातही घसरण-

चांदीच्या दराबाबत बोलायचे झाले तर लखनऊमध्येही चांदीच्या दरात किंचित वाढ झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 67,600 आहे. त्याच वेळी, ही किंमत काल 68,900 होती. म्हणजेच चांदीच्या दरात किलोमागे १३०० रुपयांची घट झाली आहे.

Today's Gold Silver Price Updates
Gold-Silver Price: सोनं-चांदी झाली स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

Today's Gold Silver Price Updates
Gold-Silver Price : सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ!

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.