Gold Rate: खरेदीच्या दिवसांमध्ये सोनं महागलं! जाणून घ्या नवे दर

आज सुद्धा सोन्याचे दर तेजीत असून चांदीचे दर घसरले.
gold rate
gold ratesakal
Updated on

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे. बुधवारी सुद्धा सोन्याच्या दरात तेजी दिसून आली होती तर चांदीचे दर मात्र घसरले होते. आज सुद्धा सोन्याचे दर तेजीत असून चांदीचे दर घसरले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दरात तेजी अपेक्षित होती.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 46,550 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,780 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 564 रुपये आहे. (gold silver price update 20 october 2022)

gold rate
Gold Rate: दिवाळीच्या तोंडावर सोने महागले! जाणून घ्या आजचे नवे दर

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

  • चेन्नई - 51,270 रुपये

  • दिल्ली - 50,950 रुपये

  • हैदराबाद - 50,780 रुपये

  • कोलकत्ता - 50,780 रुपये

  • लखनऊ - 50,950 रुपये

  • मुंबई - 50,780 रुपये

  • नागपूर - 50,700 रुपये

  • पुणे - 50,700 रुपये

gold rate
Gold Price: सोन्याच्या दरात तेजी सुरुच, जाणून घ्या आजचे नवे दर

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

gold rate
Gold Price: दिवाळी काही दिवसावर असताना सोनं महागलं! जाणून घ्या नवे दर

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.