Gold Price: दसऱ्याच्या दिवशी सोनं महागलं! जाणून घ्या नवे दर

आज दसरा असल्याने सोने चांदी खरेदीकडे लोकांचा कल जास्त असणार आहे. त्यामुळे आज सोने चांदीचा दर वाढणे, अपेक्षित होते.
Gold Price
Gold Pricesakal
Updated on

Gold Price: आठवड्याच्या सुरवातीपासून सोने चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. मंगळवारीही सोने चांदीच्या दरात तेजी दिसून आली होती तर आजही सोने चांदीचे दर वाढले. आज दसरा असल्याने सोने चांदी खरेदीकडे लोकांचा कल जास्त असणार आहे. त्यामुळे आज सोने चांदीचा दर वाढणे, अपेक्षित होते.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 47,350 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,660 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 618 रुपये आहे. (gold silver price update 5 October 2022

Gold Price
Gold Silver Price : सोन्याचे दर उतरले! जाणून घ्या नवे दर

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

  • चेन्नई - 52,100 रुपये

  • दिल्ली - 51,820 रुपये

  • हैदराबाद - 51,660 रुपये

  • कोलकत्ता - 51,110रुपये

  • लखनऊ -51,660 रुपये

  • मुंबई - 51,660 रुपये

  • नागपूर - 51,690 रुपये

  • पुणे - 51,690 रुपये

Gold Price
Gold Silver Price : सोन्याचे दर उतरले! जाणून घ्या नवे दर

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात

Gold Price
Gold-Silver Price: नवरात्रीत सोनं महागलं! जाणून घ्या आजचे नवे दर

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.