Gold-Silver Price: सोन्याच्या दरात तेजी सुरुच, जाणून घ्या आजचे नवे दर

दसरा असल्याने मोठ्या प्रमाणात सोन्याची विक्री दिसून आली त्यामुळे सोन्याच्या दरातील तेजी अपेक्षित होती.
Todays Gold, Silver price Updates
Todays Gold, Silver price UpdatesSAKAL
Updated on

या आठवड्याच्या सुरवातीपासून सोने चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. बुधवारी सोन्याच्या मुहूर्तावर सोने चांदीच्या दरात लक्षणीय वाढ दिसून आली. दसरा असल्याने मोठ्या प्रमाणात सोन्याची विक्री दिसून आली त्यामुळे सोन्याच्या दरातील तेजी अपेक्षित होती.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 47,750 रुपये तर 24 कॅरेट साठी 52,100 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 620 रुपये आहे. (gold silver price update 6 October 2022

Todays Gold, Silver price Updates
Gold Silver Price: दसऱ्याच्या तोंडावर सोनं महागलं! जाणून घ्या नवे दर

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

  • चेन्नई - 52,750 रुपये

  • दिल्ली - 52,250 रुपये

  • हैदराबाद - 52,100 रुपये

  • कोलकत्ता - 52,110रुपये

  • लखनऊ - 52,100 रुपये

  • मुंबई - 51,110 रुपये

  • नागपूर - 52,130 रुपये

  • पुणे - 52,130 रुपये

Todays Gold, Silver price Updates
Gold Silver Price: दसऱ्याच्या तोंडावर सोनं महागलं! जाणून घ्या नवे दर

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Todays Gold, Silver price Updates
Stock: एक रुपयापेक्षा कमी किंमतीच्या 'या' शेअरने गुंतवणूकार कोट्याधीश...

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.