Gold Price : धनत्रयोदशीला ग्राहकांसाठी खूशखबर, सोन्याचा भाव घसरला

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत घसरण होत आहे. त्यामुळे आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरीदाचा ग्राहकांचा चांगला लाभ घेता येणार आहे.
Todays Gold, Silver price Updates
Todays Gold, Silver price UpdatesSAKAL
Updated on

Gold Price : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत घसरण होत आहे. त्यामुळे आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरीदाचा ग्राहकांना चांगला लाभ घेता येणार आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर सोने चांदी महागलं होतं. पण दिवाळीत होत असलेली दरातली घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक आहे.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 46,280 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,480 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 557 रुपये आहे. (gold silver price update 22 October 2022)

Todays Gold, Silver price Updates
Gold Price: वसुबारसच्या दिवशी सोनं स्वस्त! जाणून घ्या नवे दर

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

  • चेन्नई - 50,890 रुपये

  • दिल्ली - 50,600 रुपये

  • हैदराबाद - 50,440 रुपये

  • कोलकत्ता - 50,440 रुपये

  • लखनऊ - 50,590 रुपये

  • मुंबई - 50,440 रुपये

  • नागपूर - 50,470 रुपये

  • पुणे - 50,470 रुपये

Todays Gold, Silver price Updates
Gold Rate: खरेदीच्या दिवसांमध्ये सोनं महागलं! जाणून घ्या नवे दर

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Todays Gold, Silver price Updates
Gold Investment : धनत्रयोदशीला सोनं की डिजिटल गोल्ड?; कोणती गुंतवणूक फायदेशीर

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.