Gold-Silver Price: लग्नाच्या हंगामादरम्यान सोनं-चांदी महागलं; जाणून घ्या आजचे दर

आज देशात सोनं आणि चांदीच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे.
Today's Gold Silver Price Today
Today's Gold Silver Price TodaySakal
Updated on

Gold-Silver Price Today: सोन्याच्या दरात चढउतार होत असतात. आज म्हणजेच 10 एप्रिल रोजी देशात सोन्याच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. देशात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 48,600 रुपये आहे, जी काल 48,250 रुपये होती. म्हणजेच सोन्याच्या किंमतीत 10 ग्रॅममागे 350 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

24 कॅरेट सोन्याची किंमत-

देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत आज 53,020 रुपये आहे. कालच्या दिवशीही ही किंमत 52,630 रुपये होती. सोन्याचे हे दर सूचक आहेत आणि त्यात GST, TCS आणि इतर शुल्क समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधावा.

Today's Gold Silver Price Today
Gold Silver Price: सोनं महागलं, चांदी स्थिर! जाणून घ्या आजचे दर

चांदीच्या दरातही वाढ दिसून आली-

चांदीच्या दराबाबत बोलायचे झाले तर चांदीच्या दरात किंचित वाढ झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 67,100 रुपये आहे. त्याच वेळी, ही किंमत काल 66,800 रुपये होती. म्हणजेच चांदीच्या दरात प्रतिकिलो 300 रुपयांची वाढ झाली आहे.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Today's Gold Silver Price Today
Gold-Silver Price: सोनं स्थिर तर चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.