ऐन लग्नसराईत सोने-चांदीचे भाव वाढले; जाणून घ्या दर

राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
gold rates
gold ratesesakal
Updated on

मागील काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात वाढ आणि घट सातत्याने सुरु आहे. सध्या लग्नसराईची धामधूम सुरु असून आता सोने-चांदीच्या (Gold-Silver Rate) दरात वाढ झाली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४८,४०० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,७०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. (Gold-Silver Rate)

gold rates
'आदरणीय पवारसाहेब तुमची अडचण...', भाजपचा पुणे मेट्रोवरून टोला

आज गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये (Mumbai) २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४८,४०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,८०० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८,४५० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,८५० रुपये असेल. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ७०,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता?

आता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलेय. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे (BIC Care) ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क (Hallmark) क्रमांक चुकीचा असल्याचे आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या (गोल्ड) माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतही तत्काळ माहिती मिळणार आहे.

gold rates
PM मोदींनी पुतिन यांची समजूत घालावी; युक्रेनच्या मंत्र्याची भारताला विनंती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.