सोन्याच्या दरात वाढ सुरुच, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

गेल्या कित्येक दिवसापासून सोने आणि चांदीच्या दर चढत्या क्रमावर आहे.
Check Today's Gold Price Updates
Check Today's Gold Price Updatesesakal
Updated on

लग्नसराईच्या हंगामात सोन्याचा दर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या कित्येक दिवसापासून सोने आणि चांदीच्या दर चढत्या क्रमावर आहे. आज सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २२ कॅरेट साठी ४७,७५० रूपये तर २४ कॅरेटसाठी ५२,०९० रूपये आहे तर चांदीच्या दरात थोडी वाढ झाली असून १० ग्रॅम चांदीचा दर आज ६२१ रूपये आहे. (Gold, Silver price Updates)

Check Today's Gold Price Updates
टाटा मोटर्स, इंडियन हॉटेल्सचे शेअर्स 26 टक्क्यांपर्यंत वाढतील, तज्ज्ञांना विश्वास...

देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट साठी १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - ५२,१५० रुपये

दिल्ली - ५२,०९० रुपये

हैदराबाद - ५२,०९० रुपये

कोलकत्ता - ५२,०९० रुपये

लखनऊ - ५२,२४० रुपये

मुंबई - ५२,०९० रुपये

नागपूर - ५२,१९० रुपये

पूणे - ५२,१९० रुपये

Check Today's Gold Price Updates
Petrol Diesel Prices : कच्च्या तेलाचे दर भडकले; पेट्रोल-डिझेल पुन्हा महागणार? जाणून घ्या आजची किंमत

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Check Today's Gold Price Updates
Bank Holiday : जून महिन्यात 'इतक्या' दिवस बँका राहणार बंद

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.