Gold-Silver Rate: सोनं आणखी महागलं; चांदी 70 हजारांच्या जवळ; जाणून घ्या नवे दर

आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं आणि चांदी या मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाली आहे.
Gold silver rate
Gold silver rate Sakal
Updated on

Gold-Silver Rate Update: सोमवारी, आठवड्याच्या पहिल्या दिवशी एकीकडे भारतीय शेअर बाजार आपटला, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार घसरण झाली, तर दुसरीकडे सोनं आणि चांदी या मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर खरेदीसाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी आजची किंमत जाणून घेणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज एमसीएक्सवर (MCX) सोन्याचा भाव 0.75 टक्क्यांनी वाढून 53,392 रुपये, तर चांदीचा भावही 1.34 टक्क्यांनी वाढून 69,957 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

Gold silver rate
Gold-Silver Price: सोनं-चांदी महागलं; जाणून घ्या आजचे दर

गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीमध्ये तेजी दिसून आली. सोन्याचे दर १२ टक्क्यांनी वाढले आहेत. दिल्लीमध्ये एक वर्षापूर्वी २४ कॅरट सोन्याची किंमत प्रति तोळा ४७,८९० रुपये इतकी होती. आज २४ कॅरट सोन्याचे भाव ५३,४५० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहेत.

भारतीय सुवर्ण बाजारात ऑगस्ट २०२० मध्ये सोने आपल्या सर्वोच्च पातळीला पोहोचले होते. सोन्याची किंमत प्रति तोळा ५६,२०० रुपये इतकी झाली होती. मात्र त्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पहायला मिळाले. गेल्या सहा महिन्यात सोन्याच्या घसरणीला आता ब्रेक लागला असून, पुन्हा एकदा सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे.

Gold silver rate
Petrol-Diesel: तेल कंपन्यांनी जाहीर केले डिझेल आणि पेट्रोलचे दर, जाणून घ्या आजची किंमत

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.